संसदेची सुरक्षा भेदल्याची घटना काल (बुधवारी) दिल्ली येथे घडल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. आधिवेशनाचं कामकाज सुरू असतानाच दोन तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदार बसतात त्या बाकांवर उडी घेतली त्यानंतर लोकसभेत एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षितेवर मोठं प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका तरूणाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. अमोल धनराज शिंदे असं या तरूणाच नावं असून तो लातूरच्या चाकूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. (Latest Marathi News)
तो घरी पोलीस भरतीसाठी जात असल्याचं सांगून निघाला होता. बेरोजगारीमुळे ६ तरूणांनी हा घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी अमोल शिंदेला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. अशातच महाराष्ट्रातील वकील असीम सरोदे यांनी अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी यासंबधीची पोस्ट आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर केली आहे.
त्याचबरोबर संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेची कायदेशीर मदत का करत आहोत यामागची भूमिकाही असीम सरोदे यांनी स्पष्ट केली आहे.
'अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. अमोल चा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा त्याला मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे. आणि त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी असे मला वाटते', असं असीम सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.(Latest Marathi News)
पुढे ते म्हणाले की, 'त्यामुळे मला Dhananjay RamKrishna Shinde यांनी लिहिलेले खालील विचार पटले. लातूरच्या २५ वर्षीय अमोल शिंदे याने संसदेत प्रवेश केला कारण तो बेरोजगार आहे. त्याला रोजगार हवाय. तो दहशतवादी किंवा गुन्हेगार नसून राज्यातील तसेच केंद्रातील असंवेदनशील धोरण प्रक्रियेच्या तो विरोधात आहे. त्या असहाय्य, पीडित, बेरोजगार तरुणाला संसदेतील खासदारांनी मारणे मला योग्य वाटत नाही. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात मारहाण करणारे खासदार नापास झाले आहेत. कमजोर बेरोजगारास मारणाऱ्या या मारकुट्या खासदारांची इभ्रत काय राहिली?', असं असीम सरोदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.