Parliament Session: "हे बारश्याचं की लग्नाचं निमंत्रण"; संसदेच्या विशेष अधिवेशनावर राऊतांची सडकून टीका

देशाच्या इंडिया बदलण्याच्या चर्चांवरही राऊतांनी भाष्य केलं आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut esakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. हे बारश्याचं की लग्नाचं निमंत्रण आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे. (Parliament Special Session Sanjay Raut scathing criticism also comment on India Vs Bharat name controversy)

Sanjay Raut
G20 Summit Delhi: बायडन यांचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह; G20 परिषदेसाठी भारताकडं होणार रवाना

हे नेमकं कसलं निमंत्रण?

राऊत म्हणाले, सरकारनं अचानक विशेष अधिवेशन का बोलावलं आहे? फक्त अनन्यसाधारण परिस्थितीतच अधिवेशन बोलावलं जातं. हे निमंत्रण बारश्याचं आहे का? लग्नाचं आहे का? मोदींच्या वाढदिवस साजरा केला जातोय? की भाजपचा निरोप समारंभ आहे? या अधिवेशनाचा नक्की अजेंडा काय आहे. हे काय सुरू आहे देशात? (Latest Marathi News)

Sanjay Raut
G20 Summit Delhi: बायडन यांचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह; G20 परिषदेसाठी भारताकडं होणार रवाना

देशात मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे, बेरोजगारी आहे, चीन देशात घुसलेला आहे, असे अनेक प्रश्न आहेत. सोनिया गांधी केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहिणार आहेत. महाराष्ट्रात मराठा, धनगर आरक्षणाचा, दुष्काळाचा प्रश्न पेटलेला आहे. (Marathi Tajya Batmya)

Sanjay Raut
'Y2K' सारखंच संकट पुन्हा येणार? 'INDIA'चं 'BHARAT' झाल्यानंतर भारतीय वेबसाईट्स बंद होतील का? जाणून घ्या

इंडिया नाव बदलणं हा फ्रॉड

देशाचं इंडिया नाव रद्द करण्यात येऊन केवळ भारत हेच नाव ठेवण्याची चर्चा सुरु आहे. हा एक फ्रॉड आहे. आम्ही इंडिया आघाडी स्थापन केल्यापासून सरकारला भीती वाटत आहे, घटनेतील नावाबद्दल भीती वाटत आहे. हा कद्रुपणा आहे, अशा शब्दांत राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.