Rajyasabha Election : पार्थ पवार, तटकरे, देवरांच्या नावांची चर्चा; राज्यसभेसाठी २७ फेब्रुवारीला मतदान

राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर २९ फेब्रुवारीला निकाल जाहीर होतील. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे.
Parth Pawar and Sunil Tatkare
Parth Pawar and Sunil Tatkaresakal
Updated on

नवी दिल्ली-मुंबई - येत्या एप्रिलमध्ये रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून सुनील तटकरे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना संधी मिळू शकते. शिवसेनेकडून (शिंदे गट) मिलिंद देवरा, भाजपकडून राम शिंदे यांची वर्णी लागू शकते.

राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर २९ फेब्रुवारीला निकाल जाहीर होतील. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. सध्या या सहा पैकी तीन जागा सत्ताधारी भाजपच्या ताब्यात असून विरोधकांच्या ‘मविआ’तील घटकपक्षांकडेही तीन जागा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या पक्षांना आपापले गड राखता येतील किंवा नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

मध्यप्रदेश आणि प. बंगालमधील प्रत्येकी पाच जागांसाठी, गुजरात, कर्नाटकमधील चार जागांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय तेलंगण, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांतील प्रत्येकी तीन जागांसाठी तर छत्तीसगड, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे.

राणे, जावडेकरांच्या जागेचा समावेश

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा यंदा रिक्त होत असून यात सत्ताधारी पक्षाचे परराष्ट्रराज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या जागेचा समावेश आहे. काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनिल देसाई यांची मुदत येत्या दोन एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागाही रिक्त होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.