पुणे : जमिनीशी संबंधित समजल्या जाणाऱ्या एक पुराव्यापैकी महत्त्वाचा पुरावा असलेला संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुम्यात (7/12) बदल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. येत्या दोन दिवसात नव्या स्वरूपातील सातबारा उतारा आता नागरीकांना उपलब्ध होणार आहे. पन्नास वर्षांनतर प्रथमच बदल करण्यात आलेल्या सातबारा उताऱ्यावर शासनाचा व ई. महाभूमीचा लोगो असलेला वॉटर मार्क तसेच गावाच्या नावाचा कोड असणार आहे. तर शेती आणि बिनशेतीसाठी वेगवेगळा सातबारा उतारा असणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ईसकाळचे ऍप
राज्याच्या अनेक भागात अद्यापही जमिनींच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून सातबारा उतारा वापरला जातो. अनेकदा बनावट सातबारा उतारा दाखवून जमीन लाटणे,त्यांची खरेदीव्रिकी करणे आदी प्रकार यापूर्वी घडले आहे आणि घडत आहेत. सातबारा उतारा हा शासकीय भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो समजत नाही. त्यातून हे प्रकार घडतात. त्यामुळे संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला होता. तसा प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काल मुंबई येथे बैठक झाली. अप्पर सचिव नितीन करीर, जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंग्म यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्यास मान्यता देण्यात आली.
सातबारा उतारा म्हणजे काय?
सात म्हणजे जमिनी मालकी (भोगवटादार) असलेल्यांची नावे आणि त्यांच्याकडे असले क्षेत्र, तर बारा मध्ये पीकपाण्याची नोंद असते. त्यामुळे त्याला सातबारा उतारा म्हटले जाते. आता त्याच्या नमुन्यामध्ये बदल होणार असल्यामुळे तो समजण्यासाठी अधिक सोपा आणि माहितीपूर्ण होणार आहे.
सांगा, 'एवढे' बिल कसे भरावयाचे ? पुण्यात वीजबिलांचा गोंधळ काही केल्या मिटेना!
असा असणार आहे नवीन सातबारा उतारा
''सातबारा उतारा अधिक सुटसुटीत व सोपा व्हावा. तसेच तो माहितीपूर्ण व्हावा, यासाठी संगणकीकृत सातबारा उताराच्या नमुन्यामध्ये बदल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसात राज्यात त्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.''
रामदास जगताप ( समन्वयक, राज्य ई फेरफार प्रकल्प )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.