मुंबई : ‘‘यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून पवार यांचा उल्लेख करतो त्यावेळी त्याचा अर्थ यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ज्या प्रकारच्या भावी महाराष्ट्राचे चित्र आपल्या मनात रंगवले होते त्या चित्रानुसार या राज्याला, या समाजाला, या राज्यशकटाला दिशा आणि गती देण्याचे काम गेल्या ४०-४५ वर्षांत पवार यांच्या नेतृत्वाने केले, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रवादी मासिकाचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांनी पवार यांच्या निवडक भाषणांचे संकलन केलेले ‘नेमकचि बोलणें’ या ग्रंथाचे प्रकाशन वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये शनिवारी उत्साहात पार पडले. शरद पवार यांनी १९८८ ते १९९६ या काळात विविध विषयावर केलेल्या भाषणांचा संग्रह या ग्रंथात केला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून संजय राऊत, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, ज्येष्ठ कवी किशोर कदम आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
उपस्थितांमध्ये शरद पवार, प्रतिभा पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार सुप्रिया सुळे, कार्यक्रमाचे निमंत्रक आणि पक्षाचे कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले आदी उपस्थित होते.
‘‘पवार यांच्या भाषणाचा हा पहिला खंड आहे. या ग्रंथात ६१ भाषणे आणि ५१२ पाने असल्याचे सांगितले. यापुढील काळात उर्वरित भाषणाचेही खंड प्रकाशित करू,’’ असे डॉ. भोंगळे यांनी मनोगतात सांगितले. पवार यांच्या काही निवडक भाषणांचे अभिवाचन ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, कवी किशोर कदम, लेखिका मनस्विनी लता रवींद्र, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, कलाकार संदीप मेहता आणि शंभू पाटील यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.