Gulabrao Patil: जनतेत खरंच नाराजीए का? गुलाबराव पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

गद्दार आणि खोके सरकार अशा शब्दांत शिंदे गटातील आमदारांना हिणवलं जात आहे, यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
gulabrao patil
gulabrao patilesakal
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांना लोकांकडून गद्दार आणि खोके सरकार अशा शब्दांत हिणवलं जात आहे, यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. पण या लोकांना कसं समजावून सांगणार यावरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. एबीपी माझ्याशी बोलताना त्यांनी हे सांगितलं. (People are upset because they think we have betrayed from ShivSena big statement by Gulabrao Patil)

gulabrao patil
Jeetenge Hum: क्रिकेट वर्ल्डकपसाठी अदानी ग्रुपची मोठी घोषणा; 1983च्या स्टार टीमसह राबवणार खास मोहिम

गुलाबराव पाटील म्हणाले, "त्रास तर होतोय ना! गद्दार, खोके असे शब्द लोक वापरतात त्याचा आम्हाला खूप त्रास होत आहे. कारण लोकांना असं वाटतंय की आम्ही गद्दारी करुन बाहेर पडलो आहोत, ती एक चीड लोकांमध्ये काही प्रमाणात आहे.

मी पंढरपुरला गेलो होतो तर तिथं माझी सभा चालू होती आणि सभा ऐकण्यासाठी आलेल्या लोकांमधून खोके असा आवाज आला. पण हा मतपेटीपर्यंत जाणारा खोका नाही. काम करणाऱ्या माणसाला कोणत्याचं गोष्टीची भीती नसते. आम्हाला जो त्रास झाला आहे तो आम्ही सहन करु शकत नाही, असा त्रास आजपर्यंत झालेला आहे. (Latest Marathi News)

gulabrao patil
Mumabi News: कॉन्स्टेबलच्या धाडसाला सलाम; दोन चिमुकल्यांना समुद्रात बुडण्यापासून वाचवलं!

पण यावेळी आम्हाला खोके कोण म्हणतंय? काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार! यांना तसं म्हणण्याचा अधिकार आहे का? हे चार-पाच वेळेस पक्ष बदललेले लोक आहेत. पण आता वेळ अशी आहे की, यांना बोलायला संधी मिळाली, आम्ही तुम्ही सर्वजण सारखेच असं हे सुरु आहे.

पण यासाठी आम्ही तळागळातील कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करतो आहोत. लोकांना आम्ही समजावून सांगतो आहोत की बाळासाहेबांनी ज्या संकल्पनेतून शिवसेना उभी केली त्या मूळ विचारानं आपण शिवसेना-भाजपसोबत आहोत, असंही पाटील यावेळी म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

gulabrao patil
PM Modi Egypt tour: PM मोदी थेट अमेरिकेतून इजिप्तमध्ये दाखल! दोन्ही देशांमधील 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा

आम्ही पक्षांतर केलेलं नाही पण माझ्या मतदारसंघात १०-२० टक्के कार्यकर्ते माझ्या विरुद्ध आहेत, हे निश्चित आहे. पण आम्ही यामध्ये दुरुस्ती करणार. मतदारसंघाची रचना जशी आहे त्यात काही गोष्टी जोडू पाहणार आणि पुढे जाणार, अशा शब्दांत त्यांनी खरी परिस्थिती कथन केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.