संभाजीराजेंचा साधेपणा भावला, शेतात औतावर बसून घेतलं जेवण

संभाजीराजे
संभाजीराजे
Updated on

अहमदनगर ः मराठा आरक्षणाचा मुद्दा आता गंभीर स्वरूप धारण करीत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी स्वतः आरक्षणाच्या लढ्यासाठी पुढाकार घेतला आहे. मराठा समाजाचाही त्यांना पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात जाऊन ते समाजबांधवांशी चर्चा करणार आहेत.

महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेल्या छत्रपती संभाजीराजेंनी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील निर्भयाच्या स्मृतिस्थळाला भेट देवून अभिवादन केलं. निर्भयाच्या आई-वडिलांसोबत तसेच गावकऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. राजघराण्यातील वारसदार असतानाही त्यांच्या अंगी कमालीचा साधेपणा आहे. ते कधीच राजेशाहीचा बडेजाव मिरवत नाहीत. आजही त्याची प्रचिती आली.(People liked the simplicity of Chhatrapati Sambhaji Raje)

संभाजीराजे
मोर्चे काढून झालेत, आता सरकारने काय ते ठरवावं - संभाजीराजे

घरून आणतात जेवणाचा डबा

कोपर्डी येथून ते औरंगाबादला गेले. कोपर्डीवरून कर्जतला जात सदगुरू डेअरीजवळ त्यांनी एका झाडाखाली वाहनाचा ताफा थांबवला. कोणत्याही दौऱ्यावर निघताना घरूनच जेवणाचा डबा सोबत घेतात. आजही त्यांनी नेहमीप्रमाणे डबा आणला होता. झाडाखाली सोडलेल्या एका औतावर बसून त्यांनी दुपारचे जेवण घेतले. त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनीही तेथेच जेवण घेतले.

बोलण्यातही मार्दव

संभाजीराजेंच्या बोलण्यातही मार्दव असते. ते कधीच वरच्या आवाजात बोलत नाहीत. प्रत्येकाचा प्रश्न व्यवस्थित समजून घेतात. दौऱ्यात त्यांच्यासोबत कर्जतच्या सकल मराठा समाजातील कार्यकर्ते होते. त्यांनाही राजेंचा साधेपणा भावला. जेवणानंतर ते कर्जत येथील कार्यकर्त्यांना भेटले. त्यानंतर ते औरंगाबादकडे रवाना झाले.

संभाजीराजे दिसताच कोसळले रडू

संभाजीराजे कोपर्डीत आल्यानंतर निर्भयाच्या आई-वडिलांना रडू कोसळले. त्यांचा दुःखावेग पाहून संभाजीराजेंनाही गलबलून आले. त्यांनी समजूत काढत निर्भयाच्या आई-वडिलांना शांत केले. तुमच्या भावना मी नक्की मुख्यमंत्र्यांकडे पोहचवेल, असेही त्यांनी सांगितले.

प्रश्न सोडवण्याकडे कल

मराठा आरक्षणाचा निकाल विरोधात गेला तेव्हा समाजात संतापाचे वातावरण होते. तेव्हा कोणी पत्रकाराने त्यांना उद्रेक होईल का असा प्रश्न केला. त्यावर ते संयतपणे म्हणाले, कोणी उद्रेक असा शब्दप्रयोग उच्चारूही नये. समाजाने कोणाला उगाचच वेठीला धरू नये, अशी त्यामागची त्यांची भावना आहे. प्रश्न चिघळवण्यापेक्षा तो कसा निकाल निघेल, याकडे त्यांचा कल असतो.

मराठा आरक्षणासाठी प्रवरा संगम येथील नदीत काकासाहेब शिंदे या तरूणाने बलिदान दिले आहे. त्या स्थळालाही संभाजीराजे भेट देणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. आंदोलनाच्या पुढील रणनीतीसाठी लवकरच बैठक होणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.(People liked the simplicity of Chhatrapati Sambhaji Raje)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()