Traffic Jam वर पर्मनंट उपाय! प्रत्येक चौकात 2 वाहतूक पोलिस; 2 तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा ड्युटी; ‘या’ वेळेत सिग्नल राहणार बंद

सकाळी 9 ते दुपारी 1 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत सिग्नल सुरू असतात. दुपारी 1 ते 4 या वेळेत सिग्नल बंद ठेवले जातात. शहरातील प्रत्येक चौकात आता रात्री किमान 9 वाजेपर्यंत वाहतूक पोलिस असावेत म्हणून वाहतूक अंमलदारांच्या वेळांत देखील बदल करण्यात आला आहे.
traffic jam solution
traffic jam solutionesakal
Updated on

सोलापूर : शहरातील २० चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा असून त्यातील १४ चौकातील सिग्नल सुरू आहेत. सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत सिग्नल सुरू असतात. दुपारी एक ते चार या वेळेत सिग्नल बंद ठेवले जातात. शहरातील प्रत्येक चौकात आता रात्री किमान नऊ वाजेपर्यंत वाहतूक पोलिस असायला हवेत, म्हणून वाहतूक अंमलदारांच्या वेळांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.

मागील महिन्यात भर दुपारी शहरातील पार्क चौकातून दुचाकीस्वाराने महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून नेले होते. काही वेळातच तो दुचाकीस्वार शहराबाहेर पसार झाला होता. दुसरीकडे अनेकदा भर दुपारी सिग्नल बंद असताना देखील रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळते.

या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक सिग्नल असलेल्या चौकात वाहतूक अंमलदार उभारलेला असावा, या हेतूने सकळी नऊ वाजता ड्यूटीवर आलेला अंमलदार दुपारी एक वाजेपर्यंत त्याठिकाणी थांबेल. तो अंमलदार दुपारी एक ते चार वाजेपर्यंत घरी जाऊन विश्रांती करायला जाईल आणि त्यावेळी दुसरा कर्मचारी तेथे येईल. घरी गेलेला अंमलदार पुन्हा चार वाजता ड्यूटीवर येईल. दुपारी चारनंतर रात्री नऊपर्यंत एका चौकात दोन वाहतूक अंमलदार थांबतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व सिग्नल सुरू करण्याचा प्रयत्न

सध्या सोलापूर शहरातील १४ चौकातील सिग्नल सुरू असून महापालिकेच्या माध्यमातून आणखी सहा सिग्नलची दुरुस्ती केली जात आहे. सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत सिग्नल सुरू ठेवले जात आहेत. जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही, वाहतूक सुरळीत राहील हा त्यामागील हेतू आहे.

- सुधीर खिराडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

बाजार समिती चौकातील सिग्नल बिनकामाचा

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील चौकात महापालिकेच्या वतीने सिग्नल बसविण्यात आला आहे. मात्र, त्याची उंची खूपच कमी असून बाजार समितीतून बाहेर पडणाऱ्या वाहनांना तो सिग्नलचा खांब दिसतच नाही. तो सिग्नल खूपच जुनाट असून त्यातील दिवे देखील अस्पष्ट दिसतात. या चौकात नेहमीच वाहतूक कोंडी दिसून येते. अनेक अपघातात काहींचा मृत्यू देखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे, पण त्यात अद्याप दुरुस्ती झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.