Pratapgad : अफझल खान कबरप्रकरणाचा वाद सुप्रीम कोर्टात; सरकारच्या कारवाईविरोधात याचिका दाखल

प्रतापगडच्या पायथ्याशी असलेली अफझल खानची कबर चर्चेत आलीय.
Afzal Khan Kabar case Pratapgad
Afzal Khan Kabar case Pratapgadesakal
Updated on
Summary

प्रतापगडच्या पायथ्याशी असलेली अफझल खानची कबर चर्चेत आलीय.

सातारा : प्रतापगडच्या (Pratapgad) पायथ्याशी असलेली अफझल खानची (Afzal Khan) कबर चर्चेत आलीय. गुरुवारी या कबरीच्या परिसरात असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता आज याच कारवाईप्रकरणी सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

अफझल खान स्मारक समितीच्या वतीनं अॅड. निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गुरूवारी याचिका दाखल केली. सरन्यायाधिशांच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आलं. कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडताना स्मारकला कोणताही धक्का लागणार याची काळजी घ्यावी, असं आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती.

Afzal Khan Kabar case Pratapgad
Gujarat Election : भाजपनंतर काँग्रेसनं 46 उमेदवारांची यादी केली जाहीर; आतापर्यंत 89 नावांची घोषणा

परंतु, खंडपीठानं गुरूवारी कोणताही आदेश आता देण्याऐवजी या संदर्भात आम्ही सविस्तर शुक्रवारी सुनावणी करू, असं म्हटलं होतं. त्यामुळं आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्थानिक प्रशासनाला अफझल खानाच्या कबरीच्या परिसरात असलेलं अतिक्रमण हटवण्याचे आदेश हाय कोर्टानं दिले होते. त्याआधी हा वाद प्रचंड पेटला होता. काहींनी अफझल खान यांची कबरच हटवली जावी, अशी मागणी केली होती. तर, काहींनी अतिक्रमण विरोधी कारवाईचा आदेशच योग्य असल्याचं मत व्यक्त केलं होतं. दरम्यान, यावरुन आता राजकारण तापलंय. अशातच सुप्रीम कोर्टात आज पार पडणाऱ्या सुनावणीलाही महत्त्व प्राप्त झालंय.

Afzal Khan Kabar case Pratapgad
विमा पाॅलिसींचे डी-मॅट पाॅलिसीधारकांनाच पोहचवेल नुकसान?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.