Research Fellowship Nagpur: राज्यातील हजारो पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. यावर्षी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यावरही त्यांपैकी मोजक्या पीएच.डी. संशोधकांचाच शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.
महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली पीएच.डी. संशोधक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. सरकारचा कोणताही प्रतिनिधी या विद्यार्थ्यांच्या भेटीला अद्याप आलेला नाही. तर पुण्यात संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. बार्टीतर्फे सरसकट शिष्यवृत्ती देण्याची मागणी केली जात आहे.
सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय, अमृत व अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्तीवर राज्य सरकारने समान धोरण निश्चित करण्याच्या नावाखाली संस्थांच्या स्वायत्ततेवर घाला घालून लाभार्थी संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक संस्थेची विद्यार्थी संख्या, इतर निकष वेगवेगळे आहे.
आता त्यात सुसूत्रता आणण्याच्या नावाखाली समान धोरण निश्चित करण्याचा निर्णय १२ ऑक्टोबर २०२३ च्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आाला. त्यासाठी वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कायमस्वरूपी समिती स्थापन करण्यात आली. यात अधिछात्रवृत्तीसाठी बार्टी २००, सारर्थी २००, टीआरटीआय १००, महाज्योती २०० अशी विद्यार्थीसंख्या निश्चित करण्यात आली. (Latest Marathi News)
शासन निर्णयाविरोधात रोष
एकट्या महाज्योतीद्वारे २०२१-२२ मध्ये ९५७ तर २०२२-२३ मध्ये १ हजार २३९ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात आली. महाज्योतीमध्ये ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांची संख्या इतर समाजाच्या तुलनेत सर्वाधिक असतानाही केवळ २०० विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
तर बार्टीची शिष्यवृत्ती संख्याही २०० करण्यात आली. त्यामुळे हा निर्णयच विद्यार्थी विरोधात असल्याची भावना होऊ लागली आहे. अधिछात्रवृत्ती संख्या घटणार असल्याने या शासन निर्णयाविरोधात रोष वाढत आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.