पिक्चर अभी बाकी है कारण माझी एंट्री आता झालीय; रामदास आठवले वानखेडेंच्या पाठिशी

पिक्चर अभी बाकी है कारण माझी एंट्री आता झालीय; रामदास आठवले वानखेडेंच्या पाठिशी
Updated on

मुंबई: क्रांती रेडकर यांनी रामदास आठवलेंची भेट घेतली आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत रामदास आठवले यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलंय की, अर्धा पाऊन तास चर्चा झाली. समाजाचे नेते आणि आंबेडकरांचे अनुयायी आहात, आपण या संबंधी भूमिका घेतली पाहिजे, असं त्यांनी मला विनंती केली आहे. आमच्या पाठिशी उभे राहा, असं त्यांनी म्हटलंय आणि मी त्यांच्या पाठिशी उभा आहे. त्यांच्यावरचे आरोप खोटे आहेत. नवाब मलिकांनी 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' असं म्हटलंय कारण या पिक्चरमध्ये अजून मी आलो नाहीये. आता माझी एंट्री झाली आहे, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच क्रांती रेडकरसारखी अभिनेत्री माझ्या घरी आली आहे, त्यामुळे मलाही आता चित्रपटात काम करावं लागेल, असंही त्यांनी मिश्किलीने म्हटलंय.

पिक्चर अभी बाकी है कारण माझी एंट्री आता झालीय; रामदास आठवले वानखेडेंच्या पाठिशी
मोदी-पोप भेटीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणाला; “अशा भेटींमुळे आपल्या…”

रामदास आठवले यांनी वानखेडे कुटुबीयांना पाठिंबा देत म्हटलंय की, मी समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या पाठिशी आहे. हे बाबासाहेबांचे अनुयायी असून ते महारच आहेत. ते मुस्लिम नाहीयेत. त्यांचं नाव दाऊद नसून ज्ञानदेवच आहे. त्यांना माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे. त्यांनी मला सगळे डॉक्यूमेंट्स दाखवले आहेत. नवाब मलिकांनी केलेले आरोप सगळे खोटे आहेत. त्यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप करण्यात येत आहेत. त्यांच्या जावयाला आठ महिने डांबण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाचा गैरवापर करुन ते दररोज गंभीर आरोप करत आहेत, जे चुकीचं आहे. समीर वानखेडेचं कुटुंब मुस्लिम नसून दलितच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पिक्चर अभी बाकी है कारण माझी एंट्री आता झालीय; रामदास आठवले वानखेडेंच्या पाठिशी
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात,१४ जणांचा मृत्यू अन् पाच जण गंभीर जखमी

पिक्चर अभी बाकी है, असं नवाब मलिकांनी म्हटलंय कारण या पिक्चरमध्ये अजून माझी एंट्री व्हायची आहे. आता ही एंट्री झाली आहे, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलयं की, मी स्वत: अधिकृत कागदपत्रे पाहिलेली आहेत. समीर वानखेडेंवरील आरोप खोटे आहेत. प्रभाकर साईलला पैसे देऊन आरोप करायला सांगण्यात आले आहेत, असा आमचा आरोप आहे. हे मोठं षड्यंत्र आहे. रिपब्लिकन पार्टी वानखेडेंच्या पाठिशी असून समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लागणार नाही. या प्रकरणी माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा वानखेडे कुटुंबीयांना असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.