राज्यभरातून संशोधकांची पितळखोरा लेणीला भेट

शिल्प, चित्रकलेचा अनोखा संगम असलेली जगातील एकमेव लेणी

Pitalkhora Buddhist Caves
Pitalkhora Buddhist Caves
Updated on

कन्नड : शिल्प आणि चित्रकलेचा अनोखा संगम असलेली पितळखोरा ही जगातील एकमेव लेणी आहे, असे प्रतिपादन लेणी अभ्यासक प्रा.डॉ. संजय पाईकराव यांनी पितळखोरा केले. राज्यभरातील लेणी संशोधक, धम्म लिपी अभ्यासकांची नुकतीच येथे भेट दिली. यावेळी झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.

अजिंठा आणि वेरूळ लेण्यांच्याही आधी इ.स. पूर्व पहिल्या व तिसऱ्या शतकात निर्माण केलेली प्राचीन लेणी म्हणून ओळख असलेल्या पितळखोरा लेणीच्या इतिहासाला उजाळा देण्याचे काम (एमबीसीपीआर) अर्थात बौद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन चळवळीने कार्यशाळेतून केले. औरंगाबाद जिल्ह्यासह बीड, जालना, परभणी, नाशिक, मुंबई आदी जिल्ह्यातून मान्यवर येथे आले होते.

लेणी संशोधक व धम्मलिपी तज्ञ अतुल भोसकेर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे धम्मलिपी प्रशिक्षक सुनील खरे (नाशिक), प्रवीण जाधव, संतोष वाघमारे, गौतम कदम, संतोष अंभोरे, विकास खरात यांनी उपस्थित लेणी अभ्यासकांना लेण्यांची निर्मिती, बौद्धकालीन प्राचीन इतिहास, निर्माते, शिलांमागील अर्थ तसेच शिलालेख या संबंधी मार्गदर्शन केले. तिसऱ्या क्रमांकाच्या लेणीतील चैत्य विहारात बुद्ध वंदनेने कार्यशाळेचा प्रारंभ झाला. लेण्यातील चित्रे, शिल्पे, अष्टकोनी स्तंभावर कोरलेले अशोक कालीन शिलालेख, लेणी क्रमांक ४ मधील दगडात कोरलेली प्राचीन हार्वेस्टिंग पद्धत, लेण्यातील पाणी एका नालीतून जमा होऊन दुसऱ्या मजल्याहून कोरीव पाईप मधूनखाली उतरवून पाच फण्याच्या नागाच्या तोंडातून पडते याबाबत माहिती दिली.

यावेळी विजय कापडणे, संतोष वाघमारे, सिद्धार्थ काळे, प्रभाकर लोखंडे, सुजाता मोरे, निरझरा रामटेके, अनामिका हाडके, रेश्मा पवार, अमोल शेलार, सचिन खरात, अमोल बोर्डे, संजय पाईकराव, डॉ जागृती तुपारे, संजय पगारे, अमोल बोर्डे, सचिन खरात, गौतम पगारे, सचिन बनसोडे, अर्जुन पटेकर, मयुरी बोराडे, मंगलबाई बोराडे, सागल गायकवाड, सरस्वती गायकवाड, विवेक सूनतकरी, नीता गंगावणे, पांडुरंग सरकटे, वैशाली साठे, सुधीर भालेराव, डॉ. हेमा थोरात, कल्पना गंगावणे, सिद्धार्थ मिसाळ, नीलेश जाधव,नंदू मोरे, कैलाश टेकाळे, सुरेखा रत्नपारखे, वर्षा थोरात, डॉ. मुग्धा मसलेकर, रजनीकांत साबळे, वैशाली पगारे, अमृता चव्हाण, पुष्पा घोडके, दीपाली अंभोरे, सविता जमधडे आदींची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()