PM CARES Fund: व्हेंटिलेटर्स ऑक्सिजनमध्ये ‘फेल’!

खासगी रुग्णालये व्हेंटिलेटर्स खरेदी करतात, ती सर्व अर्ध्या तासांचा ‘बॅकअप’ देतात
pm care fund
pm care fundpm care fund
Updated on

औरंगाबाद: पीएम केअरच्या व्हेंटिलेटर्समध्ये (PM CARES Fund ventilators) बऱ्याचवेळा ‘एअर ॲण्ड ऑक्सिजन सप्लाय फेल’ असे ‘मेसेजेस’ येत आहेत. या बाबी अहवालातून समोर आल्या आहेत. अर्थात या व्हेंटिलेटर्सच्या व इतर व्हेंटिलेटर्सच्या निर्मिती व मूल्यांतही मोठा फरक असून या व्हेंटिलेटर्सना मर्यादा आहेत. पीएम केअरच्या व्हेंटिलेटर्समध्ये ‘मिनिमम प्रेशर’ भेटला नाही तर व्हेंटिलेटर कार्य करीत नाही. उदा. चार चाकीमध्ये हवा नसली तर ती काम करणार नाही, पुढे व्यवस्थित जाणार नाही हे चालकाला लक्षात येते. अगदी तशाच प्रकारे व्हेंटिलेटर्समध्ये ‘रेशो’ खूप महत्त्वाचा आहे.

दाब व पुरवठा या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात. केवळ दाब अथवा फक्त पुरवठा या गोष्टी व्हेंटिलेटर्सना चालत नाही तर दोन्हीचे ‘संयोजन’ व्हेंटिलेटरला स्थिरपणे मिळाला नाही तर ते चालणार नाही अथवा त्यात चुका दिसतील. प्रत्येक व्हेंटिलेटर असे असतेच असे नाही. नवीन पद्धतीचे जेवढे व्हेंटिलेटर्स आहेत, त्याला बाहेरून ऑक्सिजन लागत नाही; परंतु असे व्हेंटिलेटर्स फार महागडे असतात. नऊ ते पंधरा तसेच वीस लाखांपुढेही त्याची किंमत असते. बाहेरून ऑक्सिजन न लागणाऱ्या व्हेंटिलेटरमध्ये ‘सेल्फ जनरेटिंग पंप’ असतो. म्हणून त्या व्हेंटिलेटरला बाहेरच्या ऑक्सिजनची गरज पडत नाही, अशी माहिती मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हिमांशू गुप्ता यांनी दिली.

pm care fund
औरंगाबादेत म्यूकर मायकोसिसचा धोका वाढला! शहरात तीनशेवर रुग्ण

का असतो बॅटरी बॅकअप कमी
प्रत्येक व्हेंटिलेटरमध्ये ‘बॅटरी बॅकअप’ची व्यवस्था असते; परंतु ज्यावेळी आपण व्हेंटिलेटर खरेदीबाबत व्यवहार करतो तेव्हा दर कमी करावेत यासाठी प्रयत्नही करतो. त्यामुळे दरात कपात करण्यासाठी ही फॅसिलिटी घ्यायची की नाही यावर बॅटरी बॅकअप अवलंबून असते.

अर्ध्या तासांचाही बॅटरी बॅकअप
खासगी रुग्णालये व्हेंटिलेटर्स खरेदी करतात, ती सर्व अर्ध्या तासांचा ‘बॅकअप’ देतात. तो ‘इनबिल्ट’ असतो. लाइट गेल्यानंतर १५ मिनिटापर्यंत कोणतीही समस्या येत नाही अशी व्यवस्था थेट ‘कनेक्ट’ करून घेतलेली असते. व्हेंटिलेटर्स, खाटांना स्वतंत्र कनेक्शन दिले जाते व ते यूपीएसला कनेक्ट होते.

pm care fund
बीडमध्ये Mucormycosisचे सर्वाधिक रुग्ण ४५ वर्षांच्या पुढचे

काय आहे ‘बायपॅप’ मोड
व्हेंटिलेटर्स मोड जो आहे तो ‘नॉन इनव्हिजिंग मोड असतो. त्यात केवळ पंपिंग होते. बाकीचे ‘पॅरामीटर्स’ त्यावर नियंत्रित होत नाहीत. म्हणजे ‘एनआयव्ही’ व व्हेंटिलेटर या दोन्हीमधील सेंटिंगला ‘बायपॅप’ मोड म्हणतात. पण त्यासाठी लागणारा ऑक्सिजन बाहेरून घ्यावा लागतो.

ॲडव्हान्स व्हर्जनमध्ये सर्व मोड
नवीन प्रकारच्या व्हेंटिलेटर्समध्ये आता फार ‘ॲडव्हान्स’ व्हर्जन आहे. म्हणजे ते ‘हाय फ्लो नेजल ऑक्सिजनसारखा वापरू शकतो. ते ‘एनआयव्ही’मोडमध्ये वापरू शकतो. ते ‘बायपॅप’मोडवरही वापरू शकतो त्याला व्हेंटिलेटरसारखेही वापरू शकतो. यात सर्व मोड आहेत. या व्हेंटिलेटर्सची किंमत नऊ ते १४ लाखांपर्यंत असू शकते.

pm care fund
औरंगाबादेत म्यूकर मायकोसिसचा धोका वाढला! शहरात तीनशेवर रुग्ण

काही मर्यादा
केंद्र सरकारकडून प्राप्त व्हेंटिलेटर्समध्ये ऑक्सिजन सप्लाय द्यायला हवा तो कमी आहे. उदा. मेल्ट्रॉन सेंटरवर ‘बायपॅप’ अथवा व्हेंटिलेटर लावले तर त्या ठिकाणी जो ऑक्सिजनचा दाबही कमी आहे व ऑक्सिजनही कमी आहे. साधारणतः तीन ते दहा लिटरपर्यंत क्षमता असते. त्यांना जे व्हॉल्यूम हवे ते मिळत नाही. या तांत्रिक अडचणी व तांत्रिक मर्यादाही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.