PM Kisan Samman Yojana: चौदावा हप्ता मिळवण्याची शेतकऱ्यांना संधी, अटींची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ

PM Kisan Samman Yojana
PM Kisan Samman Yojana
Updated on

PM Kisan Samman Yojana: शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत चौदावा हप्ता नुकताच जमा करण्यात आला. परंतु काही शेतकऱ्यांनी अटींची पूर्तता न केल्याने त्यांना हा हप्ता मिळाला नाही. दरम्यान वंचितांना १४व्या हप्त्याचा लाभ मिळावा यासाठी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी १० ऑगस्ट रोजी मुंबई येथे दिली.

त्यामुळे वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची संधी पुन्हा उपलब्ध झाली आहे. परंतु जिल्हा स्तरावर मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही सुरु करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे. (Farmer News)

केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्यासाठी थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जावून लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रुपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे.

दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकतीच १४व्या हप्त्याची रक्कम मिळाली आहे. परंतु काही शेतकरी त्यापासून वंचित आहेत. संबंधितांनी शेतकऱ्यांची अद्यावत भूमी अभिलेख नोंदणी, ई-केवायसी प्रमाणिकरण व बॅंक खाती आधार संलग्नीकरण करण्याची संधी १५ ऑगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. (latest marathi news)

PM Kisan Samman Yojana
Independence Day 2023 : स्वतंत्र्यदिनाची जोरदार तयारी! दिल्लीत लाल किल्ल्यावर आज 'फुल ड्रेस रिहर्सल'

अशी आहे जिल्ह्याची स्थिती

ई-केवायसी झालेले शेतकरी - एक लाख ८० हजार ७०२
आधार सिडींग झालेले शेतकरी - दोन लाख १० हजार ७८२
आधार सिडींग, अद्यावत भूमी अभिलेख नोंदणी व ई-केवायसी झालेले -
एक लाख ६६ हजार २२

३२ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी

जिल्ह्यातील ३२ हजार ४६७ शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप काही आहे. त्यात अकोला तालुक्यातील सहा हजार १४३, अकोट तालुक्यातील सहा हजार ५४९, बाळापूर तालुक्यातील चार हजार ३५०, बार्शीटाकळी तालुक्यातील तीन हजार १८९, मूर्तिजापूर तालुक्यातील चार हजार ८५८, पातूरमधील तीन हजार १९४ व तेल्हारा येथील चार हजार १३९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

PM Kisan Samman Yojana
Maharashtra Police: उत्कृष्ट तपासात महाराष्ट्र पोलिसांना एकही पदक नाही, केंद्राने जाहीर केली यादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.