Namo Shetkari Yojana: पीएम किसान पाठोपाठ आता 'नमो शेतकरी'चा हप्ता मिळणार, वाचा सविस्तर

बॅक खात्याला ‘आधार’ बंधनकारक पीएम किसान’चेच शेतकरी लाभार्थी
Namo Shetkari Yojana
Namo Shetkari Yojanaesakal
Updated on

सोलापूर: प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना यंदा सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दर चार महिन्यांतून एकदा दोन हजार रुपये, असे वर्षात तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळणार आहेत. मेअखेरीस पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष आहेत. प्राप्तिकरदाते, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी शेतकरी वगळून सर्वांना योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसरीकडे, १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील.

Namo Shetkari Yojana
‘नमो शेतकरी महासन्मान’मधून वर्षाला ६००० मिळणार; पण ‘या’ ३ बाबींची पूर्तता बंधनकारक

मात्र, पीएम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे. राज्यातील १२ लाख शेतकरी असे आहेत, की ज्यांचे बँक खाते अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही. अशा शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते लिंक करून घ्यावे; अन्यथा त्यांना या योजनेचे पैसे मिळू शकणार नाहीत.

वर्षाला लागतील १६०० कोटी

राज्य सरकारने केंद्राकडूनही राज्यातील शेतकरी लाभार्थींची माहिती मागविली आहे. केंद्र सरकारचा चौदावा हप्ता व महाराष्ट्र सरकारचा पहिला हप्ता आता मेअखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यात जवळपास ८३ लाख लाभार्थी आहेत. वार्षिक एक हजार ६६० कोटींची तरतूद करावी लागणार आहे.

Namo Shetkari Yojana
Parner Bazar Committee: बाजार समितीत सभापतिपदी वर्णी कोणाची; निलेश लंके यांच्या समोर पेच

या बाबी बंधनकारक

१ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा जमीनधारक शेतकरीच पात्र

सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल

लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी

बॅंक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक

पीएम किसान योजनेतील लाभार्थीच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेसाठी पात्र असतील. ज्या शेतकरी लाभार्थींनी त्यांचे आधार बॅंक खात्याशी संलग्न केलेले नाही, त्यांनी तत्काळ करून घ्यावे. मेअखेरीस तथा जुलैमध्ये या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.

- सुनील चव्हाण, आयुक्त, कृषी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.