PM Modi News: गिरीश बापटांसोबतचा जुना फोटो शेअर करत PM मोदींनी व्यक्त केला शोक! म्हणाले, "आमदार असताना त्यांनी..."

MP Girish Bapat Death
MP Girish Bapat Death
Updated on

PM Modi News: लोकसभा खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. गिरीश बापट गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान गिरीश बापट यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गिरीश बापट यांच्यासोबतचा एक जुना फोटो ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, गिरीश बापट यांनी महाराष्ट्रात भाजपच्या उभारणीत आणि पक्ष मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आमदार असताना त्यांनी लोककल्याणाचे प्रश्न मांडले. प्रभावी मंत्री आणि नंतर पुण्याचे खासदार म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला.त्याचे चांगले कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील.

MP Girish Bapat Death
MP Girish Bapat Death : गिरीश बापटांच्या निधनानंतर आमदार रविंद्र धंगेकर भावुक, म्हणाले…

बापटजी हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते त्यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि विशेषत: पुण्याच्या विकासासाठी ते नेहमी समोर असायचे, अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

MP Girish Bapat Death
Amritpal Singh : अमृतपालला पंजाबमध्ये घेरले? सुवर्ण मंदिरात करु शकतो आत्मसमर्पण! हाय अलर्ट जारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()