Free Ration: "ज्यांनी मतदान केले नाही त्यांना रेशन देऊ नये," मुंबईतील भाजप नेत्याची मोदींकडे मागणी

BJP: देशात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपला महाराष्ट्रात जबरदस्त धक्का बसला आहे.
Nrendra Modi Free Ration
Nrendra Modi Free RationEsakal
Updated on

देशात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपला महाराष्ट्रात जबरदस्त धक्का बसला आहे. अशात महाराष्ट्र भाजपचे उत्तर भारतीय आघाडीचे उपाध्यक्ष अर्जुन गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात अर्जुन गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले की, "ज्या लोकांनी मतदानाचा हक्क बजावला फक्त त्याच लोकांना मोफत रेशन देण्यात यावे. जे लोक लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले नाहीत अशांना मोफत रेशन देणे बंद केले पाहिजे. मतदान करणाऱ्यांनाच मोफत रेशन मिळावे, मग त्यांनी कोणत्याही पक्षाला मत दिले तरी हरकत नाही."

भाजप नेत्याने पत्रात लिहिले आहे की, "तुमच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक नेता बनण्याच्या तयारीत आहे. गेल्या 60 वर्षांपासून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केवळ मतांसाठी जनतेला मूर्ख बनवले आहे. तुमच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या विकासाबद्दल संपूर्ण जग बोलत आहे. असे असतानाही फार कमी लोकांनी मतदान केले. कमी मतदानामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे. त्यामुळे मोफत रेशन बंद करावे.

Nrendra Modi Free Ration
Sujay Vikhe: अहमदनगरमधील निकाल बदलणार? लंकेंची धाकधूक वाढली, सुजय विखेंनी 'ते' 18 लाख कशासाठी भरले

महाराष्ट्रात भाजपने शिंदे गटाच्या शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवली होती. पक्षाचे येथे मोठे नुकसान झाले. भाजपला लढवलेल्या 28 जागांपैकी केवळ 9 जागा जिंकता आल्या. तर शिंदे गटाच्या शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली.

दुसरीकडे महाविकास आघाडीने 30 जागी विजय मिळवला. यात काँग्रेसला सर्वाधिक 13, ठाकरेंच्या शिवसेनेला 9 आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या.

Nrendra Modi Free Ration
Manoj Jarange: "जरांगेंचे समाधान होतच नाही..." सगेसोयऱ्यांबाबत बोलताना असं का म्हणाले गिरीश महाजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com