नागपूर : तौक्ते वादळाने (Tauktae cyclone) फक्त गुजरातच नव्हे तर महाराष्ट्राचेही (Maharashtra) मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरातप्रमाणे (Gujrat) महाराष्ट्रालाही मदत करावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (HM Dilip Walse Patil) यांनी केली. (PM Modi should help Maharashtra also said home minister Walse Patil)
गुरुवारी नागपूर विमानतळावर बोलताना पाटील म्हणाले, मोठे नुकसान झाल्याने केंद्राकडून राज्याला आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. गुजरातला हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली यावर कोणी आक्षेप घेण्याचे कारणच नाही. तिथे मोठे नुकसान झाले आहे. मात्र महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही.
पंतप्रधान कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नसतात तर ते संपूर्ण देशाचे असतात. चक्रीवादळाचा इशारा आधीच देण्यात आला होता. त्याचे नियोजनसुद्धा केले होते. यानंतर ३०५ जणांचा मृत्यू झाला. याच्या चौकशीचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे.
तत्पूर्वी नागपूर विमानतळावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी स्वागत केले. यावेळी प्रशांत पवार, शहर प्रवक्ता श्रीकांत शिवणकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
(PM Modi should help Maharashtra also said home minister Walse Patil)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.