Manoj Jarange: "PM मोदीवर शंका तर मुख्यमंत्र्यांना आरक्षण कोण देऊ देत नाही", काय म्हणाले मनोज जरांगे?

मुख्यमंत्री शिंदेंच्या शपथेचा आदर पण आंदोलनावर ठाम आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले.
Manoj Jarange
Manoj Jarangeesakal
Updated on

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला वेळ संपला आहे त्यामुळे आंदोलनाचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारला दिलेलं 40 दिवसांचं अल्टिमेटम आज संपलं आहे.

त्यामुळे मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेआधी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाशिवाय आता थांबणार नाही, मराठा समाजाला आरक्षण देण्याचं कारण काय आहे. मुख्यमंत्र्यांना आरक्षण कोण देऊ देत नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Manoj Jarange
CJI DY Chandrachud: "आम्ही जनतेकडून मते मागत नाही, पण..."; CJI चंद्रचूड सरकारच्या कामकाजात हस्तक्षेपावर काय म्हणाले?

मुख्यमंत्री काल म्हणाले की, आम्ही टिकणारं आरक्षण देऊ त्यावर जरांगे म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्र्यांचा सन्मान करतो. मुख्यमंत्र्यांना आरक्षण कोण देऊ देत नाही हे आज दिवसभर आम्हाला शोधावं लागेल, त्यांना कोणी आरक्षण देण्यापासून अडवतं आहे. त्यांनी शब्द दिला तर ते पाळतात ही त्यांची ख्याती आहे, काल त्यांनी जी शपथ घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करतो, सन्मान करतो. आदर करतो, मात्र, आमच्या मुलाबांळाच्या आयुष्याचा विषय आहे, त्यामुळे आम्हाला आरक्षणाशिवाय थांबता नाही येणार असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Manoj Jarange
Vinayakan Arrested: जेलर फेम अभिनेत्याला अटक! दारुच्या नशेत पोलिस ठाण्यातच केला राडा

तर पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, आम्ही तुमच्या दारात आलो नाही, तुम्हीही आमच्या दारात येऊ नये, राजकारण्यांना गावात बंदी आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एकत्रित बसून यावर चर्चा करून तातडीने मार्ग काढला पाहिजे असं देखील ते यावेळी म्हणालेत.

सरकार आरक्षणाच्या मुद्द्याला गांभीर्याने घेत नाही असं दिसतंय, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली होती. कारण त्यांना गोरबरिबाची जाण आहे. आम्ही त्यांना हाक दिली होती. मराठा समाजाची संख्या देखील मोठी आहे. आम्ही विनंती करून ७ दिवस झाले अजुन कोणताही निर्णय नाही, पंतप्रधान गोरगरिबांची दखल घेतात पण, आता थोडी शंका येतीय, असंही जरांगे पुढे म्हणालेत.

Manoj Jarange
Dasara 2023 : विजयादशमीला नागरिकांकडून ‘सोन्या’ची लूट; सुवर्णबाजारात कोटींची उलाढाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक फोन केला आरक्षण देऊन टाका असा तरी कागदपत्र घेऊन ते लगेच आंतरवलीला येतील, मोदींनी तिन्ही नेत्यांना फोन केला तर लगेच आरक्षण मिळेल, पण त्यांना गोरगरिबांना द्यायला वेळ नाही असं वाटंतय असंही जरांगे म्हणालेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.