Narayan Rane: राणेंचं मंत्रिपद जाण्याच्या सुरू होत्या चर्चा; PM मोदी म्हणतात, "संघर्षातून..."

नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार असा दावा महिनाभरापूर्वीच केला होता
Narayan Rane
Narayan RaneEsakal
Updated on

आपल्या वादग्रस्त वकतव्यांमुळे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे वारंवार चर्चेत असतात. तर भाजपने काही मंत्र्यांची लीस्ट तयार केली असून त्यांची लवकरच मंत्रिपदावरून हकालपट्टी करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. विशेष म्हणजे नारायण राणे यांचं नावही या लिस्टमध्ये असल्याचं बोललं जात होतं.

अशातच ठाकरे गटातील नेत्यांनी तर नारायण राणेंचं मंत्रिपद कधीही जाऊ शकतं, असा दावा काही दिवसांपूर्वी केला आहे. मात्र या चर्चा आणि शक्यता फेटाळून लावणारी घटना समोर आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं कौतुक केलं आहे. स्थानिक पातळीवरील संघर्षातून उभा राहिलेला नेता, असं म्हणत मोदींनी राणे यांचं कौतुक केलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मोदींनी त्यांना शुभेच्छा देत त्यांचं कौतुक देखील केलं आहे.

Narayan Rane
Sharad Pawar: "पदवीचं काय घेऊन बसलात ?" अदानीच्या पाठोपाठ मोदींच्या समर्थनार्थ पवारांची बॅटिंग!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मद्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्थानिक पातळीवरून वरती आलेले, लोकप्रिय नेते आणि प्रशासक असं नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. तसेच MSME क्षेत्राला गती देण्यासाठी ते भरपूर मेहनत घेत आहेत. त्यांना दीर्घ तसेच निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

Narayan Rane
BMC Election: "ठरलं! मुंबईत भाजपचा महापौर, शिंदे-RPI ला अडीच-अडीच वर्ष उपमहापौर पद"

ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार असा दावा केला होता. नारायण राणेंकडची कामं आता संपली असून त्यांना शिवसेनेवर टीका करण्याशिवाय दुसरं काही काम नाही, अशी टीका नाईक यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.