PM Narendra Modi: अजित पवारांच्या समोरच मोदींनी काढला सिंचनाचा मुद्दा; म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात...

Poharadevi Banjara: मोदी म्हणाले की, ज्यांना कुणी विचारलं नाही त्यांची मोदी पूजा करतात, बंजारा समाजाने संस्कृती, अध्यात्म, व्यापार, सत्ता यासाठी इतिहासात मोठं काम केलं आहे. बंजारा समाजाच्या अनेक संतांनी समाज सुधारण्याचं काम केलं. परंतु स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये इंग्रजांनी या संपूर्ण समूदायावर गुन्हेगारीचा शिक्का मारला. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनेही तेच पाप केलं.
PM Narendra Modi: अजित पवारांच्या समोरच मोदींनी काढला सिंचनाचा मुद्दा; म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात...
Updated on

वाशिमः वाशिम येथील बंजारा समाजाचं दैवत पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. पोहरादेवीचं दर्शन घेऊन बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. यावेळी शेतकरी सन्मान योजनेचा १८ वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात आला. या योजनेपोटी २० हजार कोटी रुपये ट्रान्स्फर करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचाही सन्मान केला. तसेच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं. त्यांनी मुख्यमंत्री असताना बंजारा समाजाचं संग्रहालय उभारण्याचा संकल्प केला होता, ते काम पूर्णत्वास गेल्याने विद्यमान सरकारचंही मोदींनी अभिनंदन केलं.

PM Narendra Modi: अजित पवारांच्या समोरच मोदींनी काढला सिंचनाचा मुद्दा; म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात...
PM Kisan Yojana: पीएम शेतकरी योजनेचा अठरावा हप्ता मिळण्यास सुरुवात; 2000 खात्यात आले का? लगेच चेक करा

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, ज्यांना कुणी विचारलं नाही त्यांची मोदी पूजा करतात, बंजारा समाजाने संस्कृती, अध्यात्म, व्यापार, सत्ता यासाठी इतिहासात मोठं काम केलं आहे. बंजारा समाजाच्या अनेक संतांनी समाज सुधारण्याचं काम केलं. परंतु स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये इंग्रजांनी या संपूर्ण समूदायावर गुन्हेगारीचा शिक्का मारला. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनेही तेच पाप केलं.

मोदी पुढे म्हणाले की, फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा पोहरादेवी विकासाचा संकल्प केला होता. परंतु मध्येच दुसरं सरकार आलं आणि विकास मागे पडला. पुन्हा शिंदेंचं सरकार आलं आणि पोहरादेवीच्या विकासाचं काम सुरु झालं. भाजप आपल्या धोरणांच्या माध्यमातून वंचित समाजाला पुढे नेण्याचं काम करत आहे. दुसरीकडे काँग्रेस वंचित घटकाला आणखी खाली खेचण्याचं काम करत आहे. सगळे एक झाले तर देशाला विभागून टाकता येणार नाही, असं काँग्रेसला वाटतं. परंतु आपण एक राहून विकासाला साथ देण्याची गरज आहे.

मोदी म्हणाले, काँग्रेस युवकांना नशेच्या खाईत टाकत आहे. त्याच पैशातून काँग्रेस निवडणुका जिंकू पाहात आहे. परंतु आपल्याला तसं होऊ द्यायचं नाही. महाराष्ट्रातल्या सरकारने किसान सन्मान निधीसह शेतकऱ्यांना आणखी वेगळे पैसे पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमध्येही तसेच सुरु होते. परंतु कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बंदे केले.

अजित पवारांच्या उपस्थितीत सिंचनाबद्दल बोलताना मोदी म्हणाले, काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सिंचनाची कामं रोखली होती. महायुतीचं सरकार आल्यानंतर ती कामं पुन्हा सुरु झाली. एनडीए सरकार आल्यानंतर वैनगंगा-नळगंगा या नद्यांना लिंक करणाऱ्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. हा प्रकल्प ९० हजार कोटी रुपयांचा आहे. यामुळे विदर्भाचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.