किती हा विरोधाभास! जयंत पाटलांनी मोदींचा तो व्हिडिओ केला शेअर, शरद पवारांवरील टीकेला दिलं प्रत्युत्तर

pm narendra modi in shirdi criticize ncp chief sharad pawar jayant patil answer
pm narendra modi in shirdi criticize ncp chief sharad pawar jayant patil answer
Updated on

मुंबई- शिर्डी येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवारांनी ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केलं, असा सवाल करत त्यांनी कडवट टीका केली होती. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडिओ पोस्ट करुन पलटवार केला आहे.

किती हा विरोधाभास! शरदचंद्र पवार यांनी ६० वर्षांत शेतकर्‍यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती, असं म्हणत जयंत पाटलांनी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मोदी शरद पवार यांचे तोंडभरुन कोतुक करत असल्याचं ऐकायला मिळत आहे.

pm narendra modi in shirdi criticize ncp chief sharad pawar jayant patil answer
Shirdi Darshan : शिर्डी दर्शनासाठी VIP पास कसा मिळवाल? जाणून घ्या सविस्तर

मोदी एका कार्यक्रमात बोलताना म्हणताहेत की, किक्रेटच्या दुनियेत मी आणि शरद पवार होतो. त्यामुळे आमची भेट व्हायची. यावेळी क्रिकट संदर्भात आमची १० मिनिट चर्चा झाली तर शरद पवार पाच-सहा मिनिट शेतकऱ्यांविषयीच बोलायचे. कोणताही विषय काढला की ते पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यायचे.

त्यांच्या डोक्यात गाव, शेतकरी आणि शेतीमध्ये तंत्रज्ञान कसं आणता येईल याचाच विचार असायचा. शेतीमध्ये तंत्रज्ञान आणण्यासाठी ते आग्रही राहायचे. पोस्ट हार्वेस्टिंगबाबत ते जास्त विचार करायचे. आपण सर्व लोक ज्या पद्धतीने शेतीकडे पाहतो, त्याच्यापेक्षा वेगळ्या दृष्टीकोनातून ते शेतीकडे पाहतात. त्यांची या गोष्टींकडे पाहण्याची वेगळी पद्धत होती, असं मोदी व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

pm narendra modi in shirdi criticize ncp chief sharad pawar jayant patil answer
शरद पवार आणि रोहित पवारांचं जंगी स्वागत ! जेसीबीतून पुष्पवर्षाव, युवा संघर्ष यात्रेला सुरुवात

ते पुढे म्हणतात की, शेतीसंदर्भात त्यांना सगळी माहिती आहे. ऊसासंबंधी तुम्ही त्यांना विचारलं तर ते एक तास तुम्हाला त्याची माहिती देतील. साखरेचे काय करायचं आहे, किती आयात करायची आहे, असं सर्व त्यांच्या डोक्यात सुरु असतं. यावरुन हे दिसतंय की सार्वजनिक जीवन हे केवळ त्यांच्यासाठी फक्त पद आणि प्रतिष्ठेसाठी नाही, तर आपल्या लोकांचं कसं कल्याण होईल आणि त्यांच्यासाठी काही करत राहावं असा त्यांचा प्रयत्न असतो. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.