CM Eknath Shinde: महाराष्ट्रात सभा घेतल्या पण मराठा आरक्षणाबद्दल PM मोदी का बोलले नाहीत? CM शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभा घेतली पण मराठा आरक्षणावर बोलले नाहीत. त्यामुळे मराठा समाज नाराज आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal
Updated on

CM Eknath Shinde:

महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक सभा झाल्या. मराठवाड्यात देखील मोदी गेले होते. पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी गेले होते. त्यांच्या भाषणात ते कुठेही मराठा आरक्षणावर बोलेले नाहीत. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाज नाराज आहे. मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मोठं आंदोलन उभं झालं होतं. मनोज जरांगे यांनी त्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. मराठा समजा विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष राज्यात निर्माण झाला होता. दरम्यान नरेंद्र मोदी प्रचार सभेत या प्रश्नावर करा बोलेले नाहीत यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण आधीच दिले आहे. त्यामुळे कदाचित त्यावर पुन्हा बोलण्याची गरज आहे असे त्यांना वाटले नाही. अपवादात्मक आणि असामान्य परिस्थितीत सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पंतप्रधानांनी याबाबत बोलले तर सर्वत्र अशा मागण्या येऊ लागतील.

एकनाथ शिंदे यांनी इंडीयन एक्सप्रेसला मुलाखत दिली. यावेळी अनेक विषयांवर भाष्य केले.

आरक्षणामुळे नोकरी मिळेल किंवा शिक्षणात फायदा होईल, असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे आरक्षण मिळावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते.  मात्र, आरक्षणात सरकारी नोकऱ्या किती असतील? त्यामुळे आम्ही कौशल्य विकास सुरू केला. आम्ही लोकांना प्रशिक्षण देत आहोत. खासगी क्षेत्रात नोकऱ्या आहेत पण त्यांना कौशल्याची गरज आहे आणि आम्ही स्किलिंगचे काम करत आहोत. आम्ही यासाठी गडचिरोलीतील टाटा समूहासोबत करार केला आहे आणि राज्याच्या इतर भागातही करत आहोत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलाी.

दलित मतदार संतापला आहे का?

भाजपने ४०० पारचा नारा दिला असून त्यामुळे विरोधक संतापले आहे. भाजपला लोकशाही संपवायची आहे. भाजपच्या घोषणेमुळे विरोधक उरणार नाही, अशी टीका विरोधी पक्ष करत आहेत. भाजपला संविधान बदलायचे आहे, अशी टीका होत आहे. यामुळे दलित मतदार संतपाला आहे, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

महाराष्ट्रातील दलित मतदार संतापला आहे का? हा आकलनाचा विषय आहे. आपण निवडणुकीत हारलो हे लक्षात येताच विरोधकांना संविधान बदलणार असल्याचा प्रचार सुरु आहे. काँग्रेसने राज्यघटनेत ८२ दुरुस्त्या केल्या आहेत. बाबासाहेब निवडणुकीत काँग्रेसकडून पराभूत झाले, ते काँग्रेसच्या विरोधात होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनाची सुरुवात केली. राज्यघटना कोणीही पराभूत करु शकत नाही. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. विरोधकांकडे बोलण्यासारखे काही नाही म्हणून रान उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे शिंदे म्हणाले.

'जब तक सूरज चांद रहेगा, बाबासाहेब का संविधान नही बदलेगा, असे आम्ही स्पष्टपणे म्हणत आहोत. केवळ त्यांच्या संविधानामुळेच मोदीजी पंतप्रधान होऊ शकले आणि माझ्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला. दलित आणि मागासवर्गीय समाजाला समजते आणि मी त्यांना सांगेन की त्यांनी हे त्यांच्या मनातून काढून टाकावे. विरोधक मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करत आहेत.

CM Eknath Shinde
Loksabha Election Voting : आयर्लंड, अमेरिकेहून येत दांपत्य, युवतींचे मतदान; मराठवाड्यातील परदेशस्थ भारतीयांनीही बजावले राष्ट्रीय कर्तव्य

उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील कॉलर राहीली नाही -

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यंच्यावर देखील टीका केली. उद्धव ठाकरे आता फिरत आहेत, सभा घेत आहेत. याचे श्रेय मला मिळत. त्यांचा गळ्यातील कॉलर आता राहीली नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

फोडाफोडी, पक्षबदल, पक्ष विभागणी नंतर खटला मुक्त...

महाराष्ट्राच्या राजकारणत पक्षविभागणी, नेत्यांची एका पक्षातून दुसऱ्या पक्षाकडे जाणे. पक्षप्रवेश झाल्यानंतर खटले सुटणे यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तुम्ही याचे समर्थन कसे करता?, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवार म्हणाले होते, मी जर शरद पवारांचा मुलगा असतो तर शरद पवारांनी असे केले असते का? ते हुशार आहेत, पक्ष चालवला आहे आणि त्यांना अनुभव आहे. मग त्यांच्यावर अत्याचार का झाले? आमच्या पक्षात (शिवसेना)  मला कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती. पण आदित्यला पुढे ढकलून तू माझी कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला गेला ते चुकीचे आहे, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.

CM Eknath Shinde
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून मैदानात, दिग्गजांच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.