शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. शिर्डीच्या प्रवित्र भूमीला कोटी कोटी प्रणाम असं म्हणत त्यांनी निळवंडे धरणाचं पाच दशकांपासून रखडलेलं काम आज पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. (PM Narendra Modi rally at Shirdi Ahmednagar Launch of various development schemes)
मोदी पुढे म्हणाले, "महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांच्या नावावर मताचं राजकारण करणाऱ्यांनी आपल्याला थेंब थेंब पाण्यासाठी वेठीला धरलं. आज निळवंडे धरण प्रकल्पाचं जलपुजन झालं. याला १९७०मध्ये स्विकृती मिळाली. त्यानंतर पाच दशकं ही योजना लटकून राहिली. (Latest Marathi News)
पण जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा यावर वेगानं काम झालं. आता डाव्या कालव्यातून लोकांना पाणी मिळणं सुरु झालं आहे. लवकरच उजव्या कालव्यातून पाणी मिळेल"
राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी बळीराजा जलसंजीवनी योजना देखील शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध झाली आहे. दशकांपासून लटकून राहिलेल्या महाराष्ट्रातील आणखी ३६ सिंचन योजना केंद्र सरकार पूर्ण करणार आहे. याचा खूप मोठा लाभ आपल्या शेतकऱ्यांना, दुष्काळग्रस्त भागांना होईल. (Marathi Tajya Batmya)
पण आता या धरणातून पाणी मिळणं सुरु झालं आहे तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की, हा परमात्म्याचा प्रसाद आहे. त्यामुळं यातील एक थेंबही पाणी वाया जाता कामा नये. 'पर ड्रॉप मोअर क्रॉप' याअंतर्गत जेवढी पण अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा आपण वापर केला पाहजे, असं आवाहनही यावेळी मोदींनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.