PM Narendra Modi : मोदींची डिग्री नव्या संसदेच्या गेटवर लावा; संजय राऊतांची मागणी

याबरोबरच त्यांनी मोदींच्या डिग्रीचा फोटोही शेअर केला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. अशातच संजय राऊत यांनी एक मोठी मागणी केली आहे. मोदींची डिग्री फेक असल्याच्या चर्चांमध्ये राऊतांच्या या ट्वीटने लक्ष वेधलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आहे. त्यामुळे ही डिग्री नरेंद्र मोदी यांची आहे, असा दावा करण्यात येत आहे.

आपल्या ट्वीटमध्ये राऊत म्हणतात,"काही लोक म्हणतायत की पंतप्रधानांची डिग्री फेक आहे. मला खरोखऱ असं वाटतं की पॉलिटिकल सायन्स या विषयातली डिग्री ही क्रांतिकारी आणि ऐतिहासिक आहे. आणि म्हणूनच ही डिग्री नव्या संसदेच्या भव्य प्रवेशद्वारावर लावायला हवी. जेणेकरून लोकांच्या याबद्दलच्या शंका दूर होतील.

PM Narendra Modi
Pune ED Raid : पुण्याच्या मध्यवर्ती भागात ईडीची छापेमारी; बडे उद्योजक टार्गेटवर

संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधतानाही याविषयी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी चहा विकून शिकले. बीए, एमए, सगळी पॉलिटिकल सायन्सची डिग्री सगळ्यांना समजायला हवी. म्हणून नव्या संसदेसमोर लावायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः याबाबत खुलासा करावा."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.