British PM : ऋषी सुनक पंतप्रधान होताच मिलिंद नार्वेकरांचा सुधा मूर्तींना फोन

ऋषी सुनक हे सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
Milind Narvekar Sudha Murty
Milind Narvekar Sudha MurtySakal
Updated on

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आणि त्याची चर्चा जगभर होऊ लागली. सुनक यांची पंतप्रधानपदी निवड होताच शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुधा मूर्ती यांना थेट फोन केला आहे. ट्वीट करत नार्वेकरांनी याविषयीची माहिती दिली आहे.

Milind Narvekar Sudha Murty
Rushi Sunak: ऋषी सुनक यूकेचे PM होताच ट्विटरवर मिम्सचा पूर; आशिष नेहरा होतोय ट्रेंड

मिलिंद नार्वेकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, "तिरुपती देवस्थानाच्या माजी सदस्या श्रीमती सुधा मूर्ती यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनल्याबद्दल मूर्ती परिवाराला माझ्या शुभेच्छा दिल्या". ऋषी सुनक हे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई आहेत.

Milind Narvekar Sudha Murty
श्रध्दा असावी तर अशी! ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा गोमातेची पूजा करतानाचा Video तुफान व्हायरल

ऋषी सुनक भारतीय वंशाचे आहेत. त्यांचे आई वडील पंजाबी ब्राह्मण होते. ते इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. २००९ मध्ये सुनक यांनी या दोघांची मुलगी अक्षताशी बंगळुरूमध्ये विवाह केला. या दोघांना दोन मुली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.