उल्लेखनीय सेवेसाठी पोलिस पदके जाहीर

एकूण १०८२ पोलिसांचा सन्मान; महाराष्ट्रातील ४२ जणांना शौर्य पदक
Police medals announced
Police medals announced
Updated on

नवी दिल्ली : देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शौर्य, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहेत. देशातील १०८२ पोलिस कर्मचाऱ्यांना पदके बहाल करण्यात आली. शौर्य पदकाच्या विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील ४२ जणांचा समावेश आहे.

शौर्य पदक जाहीर झालेल्या ३४७ पोलिस कर्मचाऱ्यांपैकी २०४ जण जम्मू आणि काश्मीरमधील, ८० पोलिस जवान नक्षलप्रभावित भागांतील आणि १४ पोलिस जवान ईशान्य भारतातील आहेत. तसेच, यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे १०९, जम्मू आणि काश्मीर पोलिस दलाचे १०८, सीमा सुरक्षा दलातील १९, महाराष्ट्र पोलिस दलातील ४२, छत्तीसगड पोलिस दलाच्या १५ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय सेवेसाठी पदक मिळालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन पोलिस अधिकारी असून गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मान मिळालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील ३९ जण आहेत.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदके रेल्वे पोलिस दल आणि रेल्वे सुरक्षा विशेष दलाच्या कर्मचाऱ्यांना जाहीर झाली. प्रवीणचंद्र सिन्हा, प्रमुख सुरक्षा आयुक्त,पश्चिम रेल्वे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक शमसुल अर्फिन (सहाय्यक सुरक्षा आयुक्त, उत्तर फ्रंटियर रेल्वे), राजीव सिंग सलारिया (निरीक्षक,पश्चिम रेल्वे), सय्यदा तहसीन (उपनिरीक्षक, दक्षिण मध्य रेल्वे), जयश्री पुरूषोत्तम पाटील (उपनिरीक्षक, मध्य रेल्वे), प्रदीप कुमार (उपनिरीक्षक, रेल्वे मंडळ), नसीर अहमद भट (उपनिरीक्षक), एन सुब्बाराव (उपनिरीक्षक, एस ई सी रेल्वे), थिरीपाल गोटेमुक्काला (सहाय्यक उपनिरीक्षक,

दक्षिण पश्चिम रेल्वे), सुब्बाराव नाटकम (सहाय्यक उपनिरीक्षक), टीसी मौला अली, राघवेंद्र के शिरागेरी( सहाय्यक उपनिरीक्षक, दक्षिण पश्चिम रेल्वे), सुनील भागवत चौधरी (सहाय्यक उपनिरीक्षक, मध्य रेल्वे), कन्वरपाल यादव (मुख्य हवालदार, पश्चिम रेल्वे), बी. विजया सारधी ( मुख्य हवालदार), राजेंद्र सिंग हवालदार)

उल्लेखनीय सेवेसाठी पदक (महाराष्ट्रातील विजेते)

सुनील वसंत कोल्हे (सहआयुक्त, सीआयडी), प्रदीप परशुराम कन्नलू (सहा. आयुक्त, बिनतारी यंत्रणा) आणि मनोहर दगडू धनवडे (वरीष्ठ पोलिस निरीक्षक)

महाराष्ट्रातील शौर्यपदक विजेते

माहूरदार परांजने, राजरत्न खैरनार, राजू कांडो, अविनाश कुमरे, संदीप भांड, मोतीराम माडवी, दामोदर चिंतुरी, राजकुमार भालावी, सागर मूल्लेवार, शंकर माडवी, रमेश असम, महेश सयम, साईकृपा मिरकुटे, रत्नाय्या गोरगुंडा, मनीष कलवानिया, भाऊसाहेब ढोले, संदीप मंडलिक, दयानंद महादेश्वर, जीवन उसेंडी, राजेंद्र माडवी, विलास पाडा, मनोज इसकापे, समीर शेख, मनोज गजमवार, अशोक माजी, देवेंद्र पखमोडे, हर्षल जाधव, जगदेव मांडवी (दिवंगत), सेवाक्रम माडवी, सुभाष गोमले, रोहित गोमले, योगीराज जाधव, धनाजी होनमाने (दिवंगत), दसरू कुरसामी, दीपक विडपी, सूरज गंजीवार, किशोर अत्राम (दिवंगत), गजानन अत्राम, योगेश्वर सदमेक, अंकुश खंडाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()