फडणवीसांच्या घरी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणावा - मुनगंटीवार

sudhir mungantiwar
sudhir mungantiwar e sakal
Updated on

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या घरी चौकशीसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणावा अशी मागणी भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सोमवारी विधानसभेत केली. पोलिसांच्या नोटीशीमुळं फडणवीसांच्या विशेष हक्काचं उल्लंघन झाल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात स्थगन प्रस्तावाच्यारुपानं मांडला. (Police officers who went to Devendra Fadnavis house should be prosecuted says Sudhir Mungantiwar)

sudhir mungantiwar
लंडनमध्ये बंगाली भाषेतील साईनबोर्ड्स पाहून भारावल्या ममता बॅनर्जी

मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील ही पहिली घटना आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवी यांनी सभागृहात गंभीर मुद्दा उघडकीस आणला. जगात पहिल्यांदा असं घडलं की, पोलीस भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या मागे लागले नाहीत. तर विधानसभेत फडणवीसांच्या हक्कांनुसार सीआरपीसीनुसार १६० नुसार नोटीस पाठवली. नियमांचं वस्त्रहरण होत असताना गृहमंत्री देखील कृपाचाऱ्यांच्या द्रोणाचाऱ्यांच्या भूमिकेत राहिले.

पोलिसांचं राजकीयीकरण सुरु झालंय

यावेळी मुनगंटीवार यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध करताना आता सरकारकडून पोलिसांचं राजकीयीकरण सुरु झाल्याचं ते म्हणाले. आपण मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती करतो आहोत. पण या पोलीस बळाचा उपयोग सभागृहातील विशेष अधिकारांविरोधात आपण वापरणार आहोत का? असा सवालही यावेळी मुनगंटीवार यांनी केला.

अजित दादांचं अभिनंदन

दरम्यान, सभागृहात या मुद्द्यावर बोलताना मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं. ते म्हणाले, "मी अजित दादांचं अभिनंदन करतो. कारण सध्या हे जे सुरु आहे ते चांगलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.