ब्रेकिंग! पोलिस भरतीची लेखी परीक्षा 7 जुलैला; ‘या’ काळात मैदानी चाचणी झालेल्यांची एकाचवेळी लेखी परीक्षा; सोलापूर पोलिसांकडून उमेदवारांना ‘या’ सूचना

सोलापूर ग्रामीण पोलिसांकडील उमेदवारांची मैदानी चाचणी शनिवारी संपणार आहे. मैदानीत उत्तीर्ण झालेल्यांमधून एका पदासाठी 10 या प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. 7 जुलै रोजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत सोलापूर शहर पोलिस मैदानीत उत्तीर्ण झालेल्यांची लेखी परीक्षा घेणार आहेत.
solapur
पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणीSakal
Updated on

सोलापूर : पोलिस भरतीतील उमेदवारांची सध्या मैदानी चाचणी सुरू असून सोलापूर शहर पोलिसांनी त्यांच्याकडील पदांसाठी आलेल्या सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली आहे. आता सोलापूर ग्रामीण पोलिसांकडील उमेदवारांची संपूर्ण मैदानी चाचणी शनिवारी (ता. २९) संपणार आहे. मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांमधून एका पदासाठी १० या प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. ७ जुलै रोजी सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत सोलापूर शहर पोलिस भरतीतील मैदानीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. दरम्यान, २८ ते २९ जून दरम्यान मैदानी संपणाऱ्या शहर-जिल्ह्यातील उमेदवारांची लेखी परीक्षा ७ जुलैलाच होईल, असे सूत्रांनी सांगितले. त्याप्रमाणे उमेदवारांना कळविले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित शहर-जिल्ह्यांची लेखी होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

शहर पोलिस दलातील चालक शिपाई पदासाठी पोलिस भरतीत उतरलेल्या ५१२ जणांपैकी ३८१ उमेदवार मैदानी चाचणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर पोलिस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या ७८५ उमेदवारांपैकी ४१३ उमेदवार मैदानी चाचणीत उत्तीर्ण झाले आहेत. मैदानी चाचणीचा निकाल शहर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. आता शहर पोलिस दलातर्फे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची परीक्षा रविवारी (ता. ७) सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत श्री वीरतपस्वी चन्नावीर शिवाचार्य हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (अक्कलकोट एमआयडीसी रोड) येथे होणार आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी सात वाजता हजर राहावे लागणार आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केले आहे.

लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांसाठी सूचना

  • सर्व उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी वेळेत परीक्षा केंद्रांवर हजर राहणे बंधनकारक असेल.

  • उमेदवारांनी परीक्षेला येताना शासकीय ओळखपत्र, ‘महाआयटी’कडून यापूर्वी दिलेले प्रवेशपत्र व शारीरिक चाचणीवेळी दिलेले पोलिस भरतीचे ओळखपत्र घेऊन यावे.

  • उमेदवारांना पॅड, काळ्या शाईचे पेन कार्यालयाकडून पुरविले जाणार असल्याने कागदपत्रांशिवाय उमेदवारांनी कोणतेही साहित्य घेऊन येवू नये.

  • उमेदवारांनी मोबाईल, स्मार्ट वॉच, गणकयंत्र, ब्ल्युट्यूथ जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. कोणी नियम डावलल्यास त्याच्यावर कारवाई होईल आणि भरतीतून तत्काळ बाद केले जाईल.

पोलिस भरतीतील उमेदवारांसाठी ‘ही’ हेल्पलाइन

पोलिस भरतीतील लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना काही शंका असल्यास ते सोलापूर शहर पोलिस दलाच्या हेल्पलाइन क्र. ८५३०९६७६९९ यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधू शकतात. याशिवाय उमेदवार solapurpolicebharti@gmail.com यावर देखील संपर्क साधू शकतात, असेही पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी कळविले आहे.

‘सोलापूर ग्रामीण’ची आषाढी वारीनंतर लेखी परीक्षा

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातर्फे सध्या ८५ पोलिस शिपाई व नऊ चालक शिपायांची पदभरती सुरू आहे. त्यासाठी पाच हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ग्रामीण पोलिस दलाकडे अर्ज केलेल्या उमेदवारांची २९ जूनपर्यंत मैदानी चाचणी चालणार आहे. त्यानंतर आषाढी वारीसाठी पोलिसांचा बंदोबस्त नेमला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर वारीनंतर ग्रामीण पोलिसांतर्फे मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार असून तसे गृह विभागाला कळविण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.