शस्त्र परवाना देण्यावर पोलिसांचे निर्बंध! सोलापूर जिल्ह्यातील 4594 जणांकडे वैयक्तिक शस्त्र परवाने; अकलूजमध्ये सर्वाधिक, कोणत्या तालुक्यात किती जणांकडे बंदुका, वाचा...

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चार हजार ७८ जणांकडे शस्त्रे (परवान्याची बंदूक) आहेत. एकट्या अकलूज पोलिस ठाण्याअंतर्गतच ५११ जणांकडे वैयक्तिक शस्त्र परवाना आहे. आता पोलिसांनी वैयक्तिक शस्त्र परवान्यावर निर्बंध घातले असून नऊ जणांच्या अर्जांवर अद्याप निर्णय झालेला नाही. दुसरीकडे शहरातील ५१६ जणांकडे वैयक्तिक शस्त्र परवाने आहेत.
banduk license.
banduk license.sakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चार हजार ७८ जणांकडे शस्त्रे (परवान्याची बंदूक) आहेत. एकट्या अकलूज पोलिस ठाण्याअंतर्गतच ५११ जणांकडे वैयक्तिक शस्त्र परवाना आहे. आता पोलिसांनी वैयक्तिक शस्त्र परवान्यावर निर्बंध घातले असून नऊ जणांच्या अर्जांवर अद्याप निर्णय झालेला नाही. दुसरीकडे शहरातील ५१६ जणांकडे वैयक्तिक शस्त्र परवाने आहेत. आता विधानसभा निवडणुकीच्या काळात वैयक्तिक शस्त्रे जमा करून घेतली जात आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वरक्षणासाठी घेतलेले वैयक्तिक शस्त्रे जमा करून घेतली जात आहेत. पण, बॅंका, खेळाडूंसह ज्यांना खरोखरच गरज आहे, अशा १५७ जणांकडील शस्त्रे त्यांच्याकडेच ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील २५ पोलिस ठाण्यांपैकी अकलूज, मोहोळ, वळसंग व करमाळा या चार पोलिस ठाण्याअंतर्गत सर्वाधिक चौदाशे जणांनी शस्त्र परवाना घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामीणमधील अजूनही एक हजार ९४३ जणांकडील शस्त्रे जमा झालेली नाहीत. ती शस्त्रे जमा करून घेण्याची कार्यवाही सुरु असल्याचे पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

ग्रामीणमध्ये एकूण शस्त्र परवाने

  • ४०७८

  • जमा करायचे राहिलेले

  • १९४३

  • बँक व इतरांना शस्त्र वापरास परवानगी

  • १५७

  • मयत शस्त्र परवानाधारक

  • ८३

  • जमा असलेले शस्त्र

  • ११६९

  • गुन्ह्यात जप्त शस्त्रे

  • ४५

  • परवाना घेऊनही शस्त्र न घेतलेले

  • ७९

सर्वाधिक शस्त्र परवान्याची पोलिस ठाणी

  • पोलिस ठाणे वैयक्तिक शस्त्र परवाना

  • अकलूज ५११

  • मोहोळ ३३३

  • वळसंग २८२

  • करमाळा २७६

  • सांगोला २४६

  • मंगळवेढा २४४

  • मंद्रूप २१७

  • टेंभुर्णी २१२

लोकसभेपासून ११६९ जणांनी शस्त्रे नेलीच नाहीत

लोकसभा निवडणुकीवेळी देखील वैयक्तिक शस्त्रे जमा करून घेण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्वांनी आपल्याकडील शस्त्रे जमा केली. मात्र, लोकसभा निवडणूक होऊन आता तीन महिने होऊन गेले, तरीदेखील ग्रामीणमधील एक हजार १६९ जणांनी जमा केलेली शस्त्रे नेलीच नाहीत. त्या लोकांना खरोखर शस्त्रांची आवश्यकता आहे की नाही, याची माहिती संबंधित पोलिस ठाण्यांकडून घेतली जात आहे. याशिवाय शस्त्र परवाना असलेल्या ८३ जण मयत झाले असून ४५ जणांनी विविध गुन्ह्यांमध्ये शस्त्राचा वापर केला आहे. त्यांच्यासंदर्भातील निर्णय देखील पोलिस अधीक्षक कार्यालय घेणार असून त्यानंतर तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार आहे.

सोलापूर शहरात ३३ जणांनी शस्त्रे जमा

सोलापूर शहरात ५१६ जणांकडे वैयक्तिक शस्त्र परवाने आहेत. त्यापैकी ३२ जणांना सवलत (बॅंक, खेळाडू वगैरे) देण्यात आली असून आतापर्यंत ३३ जणांनी शस्त्रे जमा केली आहेत. उर्वरित लोकांकडील शस्त्रे जमा करून घेण्याची कार्यवाही पोलिस आयुक्तालयाकडून सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.