वाझेवर तुरुंगात दररोज अत्याचार, परमबीर यांचा खळबळजनक आरोप

police torture sachin waze in jail parambir singh allegations
police torture sachin waze in jail parambir singh allegationssakal media
Updated on

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांची सध्या ईडी आणि मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यापूर्वीही त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. आज त्यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात सचिन वाझेबाबत (Sachin Waze) खळबळजनक माहिती दिली आहे. वाझेवर तुरुंगात अत्याचार होत असल्याचं परमबीर म्हणाले.

police torture sachin waze in jail parambir singh allegations
वाझे-परमबीर गुप्त बैठक 'त्या' पोलिसांना महागात? पोलिस आयुक्तांची नोटीस

वाझे यांच्यावर तुरुंगात दबाव टाकला जात असून त्यांचे कपडे काढले जात आहेत. तसेच त्यांच्यावर रोज अत्याचार होत असल्याचेही आपल्याला समजले आहे, असा आरोप परमबीर सिंह यांनी ईडीच्या दोषारोपत्रात केला आहे.

गुप्त भेट कोणी घडवली? -

गायब असलेले परमबीर सिंह यांनी स्वतः मुंबईत हजेरी लावली. त्यावेळी त्यांची चांदीवाल आयोगाकडून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी सचिन वाझेसोबत गुप्त बैठक घेतल्याचे समोर आले होते. तसेच मुंबईतील काही पोलिसांनी त्यांना साथ दिल्याची माहिती होती. पण, ही गुप्त भेट नेमकी कोणी घडवून आणली? हे अद्याप स्पष्ट झालं नव्हतं. आता स्वतः परमबीर सिंह यांनी खुलासा केला आहे.

परमबीर सिंह यांनी ईडीला एक निवेदन दिले आहे. यामध्ये ठाणे गुन्हे शाखेचे डीसीपी लक्ष्मीकांत पाटील या़ंनी सचिन वाझेची गुप्तभेट घेतल्याचा उल्लेख केला आहे. पाटील यांनी चांदीवाल आयोगात वाझेची भेट घेतली होती. तसेच ते वाझेवर दबाव टाकत होते, असंही परमबीर यांनी म्हटलं आहे. पाटलांनी वाझेसह अनिल देशमुखांची देखील भेट घेतली. तसेच वाझेने ईडीला दिलेला जबाब मागे घेण्यासाठी पाटील दबाव टाकत असल्याचा आरोप परमबीर यांनी केला आहे. सिंह यांच्या म्हणण्यानुसार, चांदीवाल आयोगाच्या सुनावणीदरम्यान देशमुख यांनी 30 नोव्हेंबर 2021 रोजी वाझेची भेट घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.