राज्यातील पोलिस आयुक्तांसह उपायुक्त आणि अधीक्षकांच्या बदल्या मे महिन्यात होणार होत्या.
नागपूर - राज्यातील पोलिस आयुक्तांसह उपायुक्त आणि अधीक्षकांच्या बदल्या मे महिन्यात होणार होत्या. मात्र, त्याला ब्रेक लागल्याने आता या बदल्यांचा मुहूर्त आता जुलैमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली. जुलैच्या पहिल्याच आठवड्यापासून बदल्यांना सुरुवात होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
पोलिस विभागातील बदल्या साधारणतः मे महिन्यात करण्यात येत असते. त्या बदल्या ३० जूनपर्यंत चालतात. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यावर ३० जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. यामुळे एकीकडे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले होते. विशेष म्हणजे, चांगल्या ठिकाणी ‘पोस्टींग’ मिळावी यासाठी पोलिस अधिकारी कामाला लागतात.
त्यासाठी मंत्र्यांच्याही भेटी देण्यावर अनेकांचा भर असतो. दरम्यान बदलीबाबत अनिश्चितता वाढल्याने अनेकांनी प्रयत्न थांबविले होते. मात्र, आता पुन्हा बदली होणार असल्याचे संकेत मिळाले असल्याने अनेक अधिकाऱ्यांनी सेटींग करण्यास सुरुवात केली असल्याचे समजते. त्यातून मुंबई आणि मंत्रालयाच्या चकरा वाढल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान आता पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सरकारचे एकमत झाले असल्याचे समजते. त्यातूनच बदल्यांचा मुहूर्त जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात येण्याची शक्यता आहे. साधारणतः या बदल्या ३ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यातूनच पोलिस अधिकारी कामाला लागले असल्याचे समजते.
अनेकांची गणिते जुळणार
पोलिस बदल्यांना उशिर झाल्याने एकीकडे अनेकांची गणिते फिस्कटणार असून अनेकांची गणिते जुळणार असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी अनेकांनी पुन्हा भेटीगाठी सुरू केल्या आहेत. अनेकांची जागाही निश्चित झाली असून केवळ औपचारिका असल्याचेही चर्चा आता रंगू लागली आहे.
बदल्यांमध्ये शहरातील पाच जणांचा समावेश
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहत असताना, त्यात पोलिस आयुक्तांसह शहरातील पाच अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. यामध्ये आयुक्त अमितेश कुमार, पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आव्हाड, लोहित मतानी, नुरुल हसन आणि ग्रामीण अधीक्षकांचाही समावेश असल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.