Political News : माजी आमदार आशिष देशमुख 'सावनेर'च्या मार्गावर! चर्चांना उधाण

ashish deshmukh
ashish deshmukhe sakal
Updated on

नागपूर : माजी आमदार व कॉँग्रेसमधून निलंबित नेते डॉ. आशिष देशमुख यांनी त्यांचे वडील माजी मंत्री रणजित देशमुख याचा अभिष्टचिंतन सोहळा सावनेरात घेण्याचे ठरविले आहे. या सोहळ्याच्या पत्रिकाही वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे आशिष देशमुख आता सावनेरातून विधानसभेची तयारी करीत असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे.

ashish deshmukh
Accident News : वऱ्हाडाची बस नाल्यात कोसळली; महिलेचा मृत्यू, २३ जण जखमी

डॉ. आशिष देशमुख यांनी मागील महिन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन अनेकांना बुचकाळ्यात टाकले होते. या भेटीगाठीमुळे ते सावनेरमधून भाजपच्या उमेदवारीवर लढण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

भाजपकडे सावनेर विधानसभा मतदारसंघात विजयाची क्षमता असलेला चेहरा नाही. दहा वर्षांपूर्वी आशिष देशमुख यांनी माजी मंत्री सुनील केदार यांना कडवी झुंज दिली होती. हा इतिहास बघता भाजप पुन्हा देशमुखांवर सावनेरमधील डाव लावण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आशिष देशमुख यांनी वडील रणजित देशमुख यांचा अभिष्टचिंतन सोहळा येत्या २९ मे रोजी सावनेरला आयोजित केला आहे.

ashish deshmukh
Exam Result : आयसीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकालाची तारीख ठरली; 'या' दिवशी होणार जाहीर

रणजित देशमुख यांनी दोन दशकापेक्षा जास्त काळ विधानसभेत सावनेरचे प्रतिनिधित्व केले होते. १९९५ मध्ये सुनील केदार यांनी त्यांचा अपक्ष म्हणून पराभव केला होता. रणजित देशमुख यांचे जुने कार्यकर्ते आजही सक्रीय आहेत. या सर्वांना एकत्र आणण्यासाठी आशिष देशमुख यांनी वडील रणजित देशमुख यांचा अभिष्टचिंतन सोहळा सावनेरमध्ये घेण्याचे ठरविल्याच्या चर्चेला आता उत आला आहे. हा सोहळा सावनेर तालुक्यातील हेटी सुर्ला येथे २९ मे रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे सावनेरातील काही कार्यकर्त्यांनी नमुद केले.

रणजित देशमुख यांनी सावनेरचे प्रतिनिधित्व करताना मंत्रिमंडळात आपली छाप पाडली होती. सावनेर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या वतीने रणजित देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत असल्याचे पत्रिकेत नमुद करण्यात आले आहे.

आशिष देशमुख यांनी यापूर्वी भाजपकडून काटोल विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. परंतु त्यानंतर त्यांनी भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन भाजपशी पुन्हा जवळीक सुरू केली. परंतु सावनेरात विजयाची क्षमता असलेल्या उमेदवाराचा भाजपचा शोध आशिष देशमुख यांच्यावर थांबणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

फडणवीसांना दिली होती लढत

भाजप सोडून काँग्रेसमध्ये आल्यानंतर पक्षाने त्यांना अवघड जागा म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात पाठवले. कोणी दिमतीला नसताना देशमुखांनी तगडी लढत देऊन फडणवीसांचे एका लाखांच्या मताधिक्यांनी निवडूण येण्याचे मनसुबे उधळून लावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.