'ठाकरे सरकार बरखास्त होऊन महाराष्ट्रात पुन्हा 'रामराज्य'

घोटाळ्यांची पुन्हा चौकशी झाल्यास राष्ट्रवादीच्या मंडळींना घरात तोंड लपवून बसण्याची वेळ येईल : पाटील
Shalinitai Patil-Amit Shah
Shalinitai Patil-Amit Shahesakal
Updated on

कोरेगाव (सातारा) : काही मंत्री जरंडेश्वर (Jarandeshwar Sugar Factory) सोसायटी मोडून काढायला निघालेत. समाजाविषयी देणं-घेणं नसणारे हे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल, असा विश्वास जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील (Dr. Shalinitai Patil) यांनी व्यक्त केला. दरम्यान, जरंडेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी ईडीने (ED) योग्य तो निर्णय घ्यावा, यासह नऊ ठराव यावेळी सभेत करण्यात आले. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा श्रीमती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी माजी आमदार डॉ. पाटील बोलत होत्या.

Summary

समाजाविषयी देणं-घेणं नसणारे हे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल, असा विश्वास जरंडेश्वर कारखान्याच्या अध्यक्षा डॉ. शालिनीताई पाटील (Dr. Shalinitai Patil) यांनी व्यक्त केला.

त्या पुढे म्हणाल्या, जरंडेश्वर साखर कारखाना सभासद शेतकऱ्यांकडून काढून घेण्याचे पाप करणारे राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. न्यायालयाच्या आदेशानुसार सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठीच ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात (ED action on Jarandeshwar factory) घेतला असून न्यायालयाच्या आदेशाने ईडीने नुकताच ताब्यात घेतलेला जरंडेश्वर कारखाना ईडीकडून आपल्याला मिळेल. सहकारमंत्री अमित शहा आपल्याला नक्कीच सहकार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Shalinitai Patil-Amit Shah
'महाविकास आघाडी'त अडचण; NCP च्या आमदाराची BJP च्या आमदाराला 'ऑफर'

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही जरंडेश्वरबाबत मदत करण्याचे आश्वासन दिलेय. तर वसंतरावदादांच्या पेन्शनमधून मी माझा औषधांचा खर्च करत आहे. तुम्ही दिलेली आमदारकी, तसेच सांगलीकरांनी दिलेल्या खासदारकीच्या पेन्शनवर जरंडेश्वरची लढाई लढत आहे, असे म्हणत त्या वसंतरावदादा यांच्या आठवणींनी गहिवरल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचा नामोल्लेख टाळून त्या म्हणाल्या, ''शिखर बॅंकेत (Shikhar Bank Scam) मोठा गैरव्यवहार झाला आहे. या घोटाळ्यांची पुन्हा चौकशी झाल्यास राष्ट्रवादीच्या मंडळींना घरामध्ये तोंड लपवून बसण्याची वेळ येईल.'' सभेत चहाऐवजी सभासदांना पेढे वाटा, अशी सूचना पाटील यांनी करताच कार्यकर्त्यांनी पेढे वाटले.

Shalinitai Patil-Amit Shah
खासदार उदयनराजे भोसलेंना कोरोनाची लागण

काही मंत्री जरंडेश्वर सोसायटी मोडून काढायला निघालेत, असे नमूद करत समाजाविषयी देणं-घेणं नसणारे हे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल, असेही श्रीमती पाटील यांनी शेवटी सांगितले. दरम्यान, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक किसनराव घाडगे यांनी वाचून दाखवलेल्या नऊ ठरावांना सभेने मंजुरी दिली. या वेळी उपाध्यक्ष शंकरराव पाटील, श्रीरंग सापते, पोपटराव जगदाळे, शहाजी भोईटे, दत्तूभाऊ धुमाळ, अक्षय बर्गे, संतोष कदम, शंकर मदने, राहुल चव्हाण आदींसह संचालक, सभासद, शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.