Uday Samant Latest News : गुवाहाटीला जावून आल्यानंतर फक्त माझं खातं बदललं, मी बदललो नाही; असं का म्हणाले उद्योगमंत्री?

'फायर ब्रिगेडचा प्रस्ताव आणला असला, तरी कधी कधी राजकीय आग देखील उठते'
Uday Samant
Uday Samant esakal
Updated on
Summary

राज्यात काकांना सोडून पुतणे गेले आहेत. मात्र, आमच्या जिल्ह्यात काका-पुतणे एकत्र आहेत.

Kolhapur News : आजचे वातावरण जरी थंड असले आणि एमआयडीसीतील आगीच्या संदर्भाने फायर ब्रिगेडचा प्रस्ताव आणला असला, तरी कधी कधी राजकीय आग देखील उठते. त्यावेळी या ‘फायर ब्रिगेड’चा महाडिक आणि पाटील या दोघांनी मिळून उपयोग करावा, असं आवाहन उदय सामंत (Uday Samant) यांनी केला.

Uday Samant
Shivendraraje Bhosale : छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; शिवेंद्रराजेंनी व्यक्त केला वेगळाच संशय

यासाठी दोन गाड्या घ्यायला लागल्या तरी चालतील, अशा शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राजकीय आग पेटणार नाही, याची दक्षता घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं. गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील विकासकामांच्या भूमिपूजनावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik), आमदार ऋतुराज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी रंगली. आमदार ऋतुराज पाटील यांनी गोकुळ शिरगाव एमआयडीसीसाठी १३ कोटींच्या फायर स्टेशनला मंजुरी दिल्याबद्दल उद्योगमंत्री सामंत यांना धन्यवाद दिले. त्यावर नुसती प्रशासकीय मंजुरी देवून आम्ही थांबणार नाही. पुढील १५ दिवसांत निविदा काढून लवकरात लवकर फायर स्टेशनचे काम सुरू केले जाईल.

Uday Samant
Manipur Violence : महिलांवर अत्याचार होत असेल, तर भाजप सरकार तातडीनं कारवाई करतं; चित्रा वाघांचा विरोधकांवर निशाणा

तसेच फायर स्टेशनची मागणी अतिशय योग्य असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले. राजकीय आग उठल्यानंतर महाडिक आणि पाटील यांनी ‘फायर ब्रिगेड’चा उपयोग करावा, असे त्या दोघांकडे पाहून आवाहन करताच उपस्थितांमध्ये हास्य पसरले.

सामंत म्हणाले, ‘मला आज मनापासून आनंद होत आहे की, राजकारणामध्ये मनभेद, मतभेद असतात. परंतु, एखाद्या कारणासाठी हे माझे काम आहे. माझ्या जिल्ह्यातील, मतदारसंघातील आणि माझ्या लोकांचे काम असल्याचे समजून सगळे हेवेदावे बाजूला ठेवून लोकप्रतिनिधी एकत्र येतात. त्याच भागाचा विकास होत असतो आणि तोच आदर्श दाखविणारे आजचे व्यासपीठ आहे.’

Uday Samant
नीलिमाच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाला अटक, महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता!

आमच्या जिल्ह्यात काका-पुतणे एकत्र

राज्याचे आणि कोल्हापूरचे राजकारण वेगळे आहे. राज्यात काकांना सोडून पुतणे गेले आहेत. मात्र, आमच्या जिल्ह्यात काका-पुतणे एकत्र आहेत, असे खासदार महाडिक आणि आमदार पाटील यांच्याकडून पाहून खासदार माने यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Uday Samant
Kolhapur : मुश्रीफांनी इशारा देताच फडणवीसांची 'सुळकूड योजने'त एन्ट्री; वाद चिघळणार की पाणीप्रश्न सुटणार?

‘गुवाहाटी’नंतरही मी बदललो नाही

‘उच्च शिक्षणमंत्री असताना मी केलेल्या कामांचा अनुभव आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितला. आजही माझे कामाला प्राधान्य आहे. गुवाहाटीला जावून आल्यानंतर केवळ माझे खाते बदलले आहे. मी बदललो नाही,’ असे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()