‘ईडी’च्या धास्तीनेच राजकीय उलथापालथ! दोन मंत्री तुरुंगात, राहुल गांधीही सुटले नसल्याची भीती

‘ईडी’च्या चौकशीनंतर महाविकास आघाडीतील दोन मंत्री (अनिल देशमुख, नवाब मलिक) जेलमध्ये गेले आहेत. आता परिवहन मंत्री ॲड. अनिल परबदेखील सध्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही ‘ईडी’ची नोटीस गेली असून राहुल गांधी यांची सलग तीन दिवस ३० तास चौकशी झाली. याची धास्ती शिवसेनेतील काही नेत्यांनी, आमदारांनी घेतल्याचे बोलले जात आहे.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray esakal
Updated on

सोलापूर : तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार की काय, अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. भाजपच्या माध्यमातूनच तसा प्रयत्न होत असतानाही पक्षाचे नेते त्यासंदर्भात काहीच माहिती नसल्याचे भासवत आहेत की का, अशी स्थिती पहायला मिळत आहे. पण, सध्याची राजकीय उलथापालथ ही राजकीय हेतूने प्रेरित नसून ’ईडी’च्या धास्तीनेच होत असल्याचा आरोप शिवसेनेतील काही नेते करीत आहेत.

CM Uddhav Thackeray
महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

‘ईडी’ची अनेकांना धास्ती

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच सरकार पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पण, तीन वर्षे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून काम करणाऱ्या शिवसेना नेत्यांना (नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, माजी मंत्री तानाजी सावंत व त्यांच्यासोबतचे आमदार) यांना आताच स्व. बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाची आठवण का झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, ‘ईडी’च्या चौकशीनंतर महाविकास आघाडीतील दोन मंत्री (अनिल देशमुख, नवाब मलिक) जेलमध्ये गेले आहेत. आता परिवहन मंत्री ॲड. अनिल परबदेखील सध्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही ‘ईडी’ची नोटीस गेली असून राहुल गांधी यांची सलग तीन दिवस ३० तास चौकशी झाली. याची धास्ती शिवसेनेतील काही नेत्यांनी, आमदारांनी घेतल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच ही राजकीय उलथापालथ होऊ लागल्याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

CM Uddhav Thackeray
मी पुन्हा येईन! राज्यसभा, विधान परिषदेनंतर आता सत्तापरिवर्तनाचा प्लॅन?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्रित लढली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तुलनेत सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र, अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरून युती तुटली आणि सरकार स्थापन करून मुख्यमंत्री म्हणून ‘मी पुन्हा येईन’ म्हणणारे देवेंद्र फडणवीस हताश झाले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली नव्हती, असे सांगितले. तरीही, अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावर शिवसेना (उध्दव ठाकरे) ठाम राहिली. त्यानंतर त्यांनी माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या गटाला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. पण, त्याचवेळी अजित पवारांन प्रखर विरोध झाला आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर शिवसेनेने परंपरागत विरोधक काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून भाजपमधील नेतेमंडळी सरकार पाडण्याच्या गोष्टी करू लागली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा तसे सांगितले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही काहीवेळा तसे वक्तव्य केले होते. पण, तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींनी (शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले) सरकार पाच वर्षे चालेल, असे स्पष्ट केले. त्यानुसार सर्वकाही सुरळीतही होते. पण, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निकालानंतर आमदारांची नाराजी ओळखून भाजपने डाव टाकला आणि तो यशस्वी होत असल्याची आता स्थिती आहे. तत्पूर्वी, राजकारण करताना ज्यांच्याकडून काही चुका झाल्या किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांच्या मागे ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’चा ससेमिरा लागला आहे. सुरवातीला काही नेत्यांना नोटीस पाठवून चौकशी झाली. त्यानंतर शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख तर मनी लॉन्ड्रींगप्रकरणी नवाब मलिक हे दोन मंत्री जेलमध्ये गेले. तरीही, सरकार मजबूत स्थितीत चालूच राहिले. त्यावेळी मात्र, थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबियांपर्यंत ‘ईडी’ पोहचली. त्याचवेळी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, सोनिया गांधींनाही ‘ईडी’ने नोटीस धाडली. राज्यातील प्रताप सरनाईक, अनिल परब, संजय राऊत यांच्यासह अनेकांना ‘ईडी’ची नोटीस आली. अशावेळी आपलेदेखील काही खरे नाही, याची भीती मनाता बाळगून ही राजकीय उलथापालथ सुरु झाल्याची चर्चा आता शिवसेनेच्या गोठ्यात सुरु आहे.

CM Uddhav Thackeray
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने ‘महाविकास’ला धडा! महापालिका, झेडपीसाठी तिन्ही पक्ष स्वबळावर

सोलापूरचे चारही जिल्हाप्रमुख म्हणाले...

सोलापूर शहर व जिल्ह्यातील ११ तालुक्यांसाठी शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख आहेत. गणेश वानकर, पुरुषोत्तम बरडे, धनंजय डिकोळे व संभाजी शिंदे यांचा त्यात समावेश आहे. ते म्हणाले, सरकार कोणाचेही असो आम्ही सर्व जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व इतर कार्यकर्ते शिवसेना व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.