Politics : धनंजय मुंडेंची प्रितम मुंडेंवर जोरदार टीका; म्हणाले, खासदारांना रेल्वे बोगी निर्मिती...

dhananjay Munde and pritam Munde
dhananjay Munde and pritam Munde
Updated on

बीड : केंद्रातील भाजपची नऊ वर्षांची सत्ता व राज्यातील आतापर्यंतची सहा वर्षांची सत्ता असताना जिल्ह्याला काय मिळाले, हे सर्वांनाच माहीत आहे. जिल्ह्यात रेल्वे बोगीनिर्मिती कारखाना आणला असता तर ऊसतोड मजुरी ८० टक्के कमी झाली असती. मात्र, खासदार म्हणून त्यांना कारखाना आणण्यात अपयश आल्याची टीका आमदार धनंजय मुंडे यांनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यावर केली.

dhananjay Munde and pritam Munde
Crime : पदवीची विद्यार्थिनी अल्पवयीन मुलाला घेऊन पळाली; आळंदीत केला विवाह

अहमदनगर येथे नऊ तारखेला होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी सभेची माहिती देण्यासाठी श्री. मुंडे यांनी रविवारी (ता. २८) पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार प्रकाश सोळंके, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, माजी आमदार संजय दौंड, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, उषा दराडे, सय्यद सलिम, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या कथित जागावाटप यादीत बीडसाठी धनंजय मुंडे यांचे नाव आल्याच्या मुद्द्यावर विचारले असता दिल्ली माझ्यासाठी दूर आहे. आणखी २० - २५ वर्षे विचार नसून लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा विचार नाही. आपली उपयुक्तता व गरज राज्यातच अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.

dhananjay Munde and pritam Munde
Maharashtra Politics: लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होणार? प्रशासनाला महत्त्वपूर्ण आदेश प्राप्त

विद्यमान खासदारांच्या कामाबाबत आपल्याला काय वाटते, या प्रश्नावर धनंजय मुंडे म्हणाले, जिल्ह्यात बोगी निर्मिती कारखाना आला असता तर जिल्ह्याची ओळख औद्योगिक जिल्हा म्हणून झाली असती. राज्याच्या व केंद्राच्या सत्तेतून जिल्ह्याला काहीच मिळाले नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

पालकमंत्री सावेंनी नेमले एजंट

जिल्हा नियोजन समिती विकास निधीच्या मुद्द्यावर आमदार बाळासाहेब आजबे यांनी थेट पालकमंत्री अतुल सावे यांनी एजंट नेमल्याचा गंभीर आरोप केला. धनंजय मुंडे यांनीही विकास निधी वितरणाबाबत टीका केली.

जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला

सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत आहे. दरम्यान, अहमदनगर येथील सभेला जिल्ह्यातून सर्वाधिक उपस्थिती असेल. वैद्यनाथ कारखान्यात ॲडजस्टमेंट नसून शेतकरी हितासाठी आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे, पंडितअण्णा मुंडे यांनी हा कारखाना उभारलेला आहे. कारखान्यावर एक हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. भविष्यात कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी ही तडजोड केली असे मुंडे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()