Pooja Khedkar Controversy : पूजा खेडकर प्रकरणात आणखी UPSCचे आणखी काही अधिकारी अडकणार? तपासासाठी उच्चस्तरिय समिती स्थापन

Pooja Khedkar controversy news : पूजा खेडकर या २०२३ तुकडीच्या सनदी अधिकारी आहेत. त्यांचा परिविक्षा (Probationary) कालावधी अजून संपलेला नाही.
Pooja Khedkar
Pooja Khedkarsakal
Updated on

नवी दिल्ली : आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे दावे व इतर तपशीलाची पडताळणी करण्यासाठी एक उच्चस्तरिय समिती स्थापन झाली आहे. परंतु यात केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) काही अधिकारी अडकण्याची शक्यता आहे.

पूजा खेडकर या २०२३ तुकडीच्या सनदी अधिकारी आहेत. त्यांचा परिविक्षा (Probationary) कालावधी अजून संपलेला नाही. परंतु त्यापूर्वीच त्यांच्या निवडीबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. त्या दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र देऊन त्यांनी आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर खरेच त्यांना दृष्टीदोष आहे काय, याबद्दल तब्बल सहावेळा विचारणा करूनही त्यांनी वैद्यकीय चाचणी केली नाही. तसेच उत्पन्नाच्या प्रमाणपत्राबद्दलही प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्वांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारच्या डीओपीटी विभागातील अतिरिक्त सचिवांची नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारच्या या विभागाच्या अखत्यारित यूपीएससी कार्य करते.

Pooja Khedkar
Pooja Khedkar : IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईचा मुळशी पॅटर्न! पिस्तूल दाखवून शेतकऱ्यांना धमकावले... Video Viral

परंतु हे प्रकरण केवळ पूजा खेडकर यांच्यापुरतेच मर्यादित नसून यात यूपीएससीचे काही अधिकारी सामील असण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर यांच्या कागदपत्रांची पहिल्यांदा पडता्ळणी का झाली नाही? किंवा झाली असल्यास यात त्रुटी कशा राहिल्या? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. या चौकशीचा अहवाल येत्या दोन आठवड्यात मिळणार आहे. यानंतर डीओपीटी विभाग पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करू शकतो. यूपीएससीच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय पूजा खेडकर यांच्याबाबत घडलेले प्रकरण होऊ शकत नाही, असे सूत्रांनी सांगितले.

पूजा खेडकर यांच्यासोबत त्यावेळच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर यांच्यावर झालेले आरोपात तथ्य आढळून आल्यास त्यांना सेवेतून बरखास्त करण्याची कारवाई होऊ शकते.

Pooja Khedkar
Pooja Khedkar Case : कागदपत्रांसह खासगी मोटार हजर करा; लाल दिवा लावल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी बजावली नोटीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.