Pooja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट! दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे सुधारित अहवाल; ज्यांनी प्रमाणपत्र इश्यू केलं त्यांना...

Pooja Manorama Dilip Khedkar Latest News: मागच्या दोन आठवड्यांपासून पूजा खेडकर नॉट रिचेबल आहे. पुणे पोलिसांनी तीनवेळा नोटीस पाठवूनही ती चौकशीला हजर राहात नाहीये. जिल्हाधिकारी पुणे यांच्याविरोधात तिने छळाची तक्रार दिली होती. परंतु त्याच्याच चौकशीसाठी ती हजर राहात नसल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.
Pooja Khedkar MBBS Admission
Pooja Khedkar MBBS AdmissionEsakal
Updated on

Pimpri Chinchwad: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे रोज नवनवे कारनामे पुढे येत आहेत. पुजाचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामतीमध्ये वडिलांचं नाव बदलून जमीन खरेदी केल्याचं प्रकरण मंगळवारी पुढे आलं होतं. दुसरीकडे पुजाच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबतचा सुधारित अहवाल दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे सादर होणार असल्याची माहिती येत आहे.

पूजा खेडकरने बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा आरोप तिच्यावर आहे. याशिवाय तिने नाव बदलून परीक्षा दिल्याचंही पुढे आलेलं असल्याने तिच्यावर थेट यूपीएससीने गुन्हा दाखल केलाय. तर ट्रेनिंग सेंटरने तिचा प्रशिक्षण कालावधी रोखला आहे.

मागच्या दोन आठवड्यांपासून पूजा खेडकर नॉट रिचेबल आहे. पुणे पोलिसांनी तीनवेळा नोटीस पाठवूनही ती चौकशीला हजर राहात नाहीये. जिल्हाधिकारी पुणे यांच्याविरोधात तिने छळाची तक्रार दिली होती. परंतु त्याच्याच चौकशीसाठी ती हजर राहात नसल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.

Pooja Khedkar MBBS Admission
Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेचा नवा विक्रम; २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल

पूजाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून अपंगत्वाचा दाखला नियमबाह्य पद्धतीने घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात वायसीएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांचा फेरअहवाल पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडे दाखल झाला आहे. डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी पूजा खेडकर संदर्भात दोन पाणी अहवाल पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडे सादर केला आहे.

तांत्रिक बाबी आणि शासकीय निकषाच्या आधारे पूजा खेडकरला अपंगत्वाचा दाखला दिला असल्याची खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे. मात्र वायसीएम हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक्स आणि फिजिओथेरपीस्ट डॉक्टरांना क्लीन चीट मिळाली की नाही, हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे.

Pooja Khedkar MBBS Admission
Eknath Shinde: "एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात शाहांना दिल्लीत भेटले"; कुणी केली राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत चौकशीची मागणी?

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त पूजा खेडकर संदर्भातील मुख्य सुधारित अहवाल दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे सादर करणार आहेत. त्यानंतरच त्या अहवालामध्ये नेमकं काय आहे, हे स्पष्ट होणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात डॉक्टर निर्दोष सुटतात की नाही, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.