Pooja Khedkar : बाणेरमध्ये पूजा खेडकरच्या आईचं बेकायदेशीर बांधकाम; मनपाची घरावर नोटीस

Pooja Khedkar : बाणेरमध्ये पूजा खेडकरच्या आईचं बेकायदेशीर बांधकाम; मनपाची घरावर नोटीस
Updated on

पुणेः मागच्या आठवड्यापासून चर्चेत आलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे रोज नवनवे कारनामे पुढे येत आहे. प्रशिक्षणाच्या कालवधीत खासगी ऑडी कारला दिवा लावल्याने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची केबिन बळकावत वेगवेगळ्या डिमांड ठेवल्यामुळे त्या चर्चेत आलेल्या होत्या.

पूजा खेडकर यांची आता वाशिम येथे बदली करण्यात आलेली आहे. त्यानंतर त्यांच्याशी संबंधित अनेक प्रकरणं पुढे येत आहे. वडिलांकडे कोट्यवधींची मालमत्ता असताना पूजा खेडकर यांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतला, खोट्या दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतला, असा आरोप त्यांच्यावर होतोय.

Pooja Khedkar : बाणेरमध्ये पूजा खेडकरच्या आईचं बेकायदेशीर बांधकाम; मनपाची घरावर नोटीस
ENG vs WI, Test: निवृत्त झालेल्या अँडरसनची जागा घेणार 'हा' वेगवान गोलंदाज, दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर

त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्यााच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. खेडकर कुटुंबियांचे रोज नवनवीन कारनामे पुढे येत आहेत.

त्यातच आता पुण्यातील बाणेर येथे पूजा खेडकरच्या आईने बेकायदेशीर बांधकाम केल्याचा प्रकार पुढे आलेला आहे. मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेल्या घराच्या बांधकामाचा काही भाग फुटपाथवर आला आहे. त्यामुळे पुणे महनगर पालिकेने त्यांच्या घरावर नोटीस डकवली आहे.

Pooja Khedkar : बाणेरमध्ये पूजा खेडकरच्या आईचं बेकायदेशीर बांधकाम; मनपाची घरावर नोटीस
Rohit Sharma : "तुम्ही रोहित शर्मासारखे दिसता " ; मराठी अभिनेत्याला चाहत्याने केली रोहितच्या बायोपिकमध्ये काम करण्याची विनंती

दरम्यान, पूजा खेडकराला २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग सर्टिफिकेट देण्यात आलं होतं, त्यानंतर २०२० मध्ये तिला मानसिक आजारी असल्याचं सर्टिफिकेट देण्यात आलं होतं. शासकीय कायदपत्रांमधून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २०२१ मध्ये नेत्र दिव्यांग आणि मानसिक आजारी असे दोन्ही एकत्र करून तत्कालीन मंडळाने पूजा खेडकर यांना बहुविकलांगता सर्टिफिकेट दिल्याचं शासकीय कागदपत्रांमध्ये आढळून आल्याचं नगरच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. त्यामुळे याप्रकरणात आता तत्कालीन डॉक्टरांची नावे देखील समोर येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.