मुंबई- मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असल्याने सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे. बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षावर दाखल झाले आहेत. तसेच या बैठकीला राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल व सुनील तटकरे हे नेते देखील उपस्थित आहेत. (Possibility of calling a special session for Maratha reservation issue Urgent meeting at Varsha bungalow)
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. बैठकीमध्ये विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून उद्या सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून राज्यात कायदा व सुव्यवस्था आटोक्यात राहिल याबाबतचं आवाहन व विरोधीपक्षांकडून सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ शकते. यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होईल.
सोमवारी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चेसाठी दाखल झाले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांच्यात बैठक होत असून मराठा आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे. मराठा आरक्षणावरुन वातावरण उग्र बनले असल्याने यावर तोडगा काढण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. बैठकीत काही निर्णय होईल का? याकडे लक्ष असणार आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.