Vidhan Parishad Election
Vidhan Parishad ElectionEsakal

Vidhan Parishad Election: विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची शक्यता; काय आहे जागांचे गणित?

Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या निवडणुकीमध्ये विधानसभेचे आमदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीमध्ये क्रॉस व्होटिंगची शक्यता वर्तवली जात आहे. या जागांचे गणित काय आहे ते जाणून घ्या.
Published on

विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत घडामोडींना वेग आला आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या निवडणुकीमध्ये विधानसभेचे आमदार मतदान करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये अस्वस्थता असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत क्रॉस व्होटींगची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १२ जुलै रोजी यासाठीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर विजयासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

कोणाला किती जागा मिळण्याची शक्यता?

भाजप आणि छोट्या मित्रपक्षांचे मिळून ५ उमेदवार. तर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी(अजित पवार गट) यांच्या पक्षांना प्रत्येकी २ उमेदवार तर काँग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट यांना देखील १ उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपने ६ वा उमेदवार दिला तर अपक्षाला पुरस्कृत केलं तर मात्र निवडणूक अटळ आहे. यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

Vidhan Parishad Election
Biennial Vidhan Parishad Election: द्विवार्षिक विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर; 12 जुलैला मतदान अन् मतमोजणी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार १२ जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मजमोजणीही पार पडेल. विधानसभा आमदारांनी निवडून दिलेल्या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपत असल्यामुळे ही निवडणूक जाहीर झाली आहे. ही द्विवार्षिक निवडणूक आहे, कारण दर दोन वर्षांनी यातील सदस्य बदलत जातात.

Vidhan Parishad Election
Mumbai Ice Cream Case: मुंबईमधील आईस्क्रीममध्ये सापडलेलं मानवी बोट कोणाचं? पुण्याच्या कनेक्शनचा पोलिसांनी केला खुलासा

कोणते सदस्य होत आहेत निवृत्त?

डॉ. मनिषा कायंदे

विजय गिरकर

अब्दुल्ला खान दुरानी

निलय नाईक

अॅड. अनिल परब

रमेश पाटील

रामराव पाटील

डॉ. वजहत मिर्झा

डॉ. प्रज्ञा सातव

महादेव जानकर

जयंत पाटील

Vidhan Parishad Election
अजित पवारांचा आमदार पलटला! शिक्षक मतदारसंघासाठी ठाकरे गटाच्या उमेदवाराला दिला जाहीर पाठिंबा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.