नवी दिल्ली : राज्यातील एसटी कामगारांच्या संपावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. विधान परिषद सभापती यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत एसटी कामगारांच्या संपावर विलीनीकरण सदृश्य मार्ग काढण्यात आल्याची माहिती आहे. विलीनीकरणाचा लढा न्यायालयीन सुरू असून कामगारांच्या इतर मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक तयारी दाखवली आहे. उद्या विधान परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब एसटी कामगारांचे निवेदन पटलावर ठेवणार आहेत.(Possibility of settlement on strike of ST workers all party meeting begins)
या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, मंत्री जयंत पाटील, आमदार दिवाकर रावते, शशिकांत शिंदे, सुधीर तांबे, अप्पर मुख्य सचिव परिवहन, प्रधान सचिव, व्यवस्थापकीय संचालक एस टी महामंडळ आदी उपस्थित होते.
दरम्यान, एसटी कामगारांना सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ, संपात सहभागी झालेल्या कामगारांवर कारवाई न करता त्यांना सेवेत रुजू करून घेणे, मॅट सुरू करणे याची तयारी आजच्या कमिटीच्या बैठकीत राज्य सरकारकडून दाखवण्यात आल्याचं कळतंय. यामुळं एसटी कामगारांचा संपावर अंतिम तोडगा निघेल असं सांगितलं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.