Potholes Repair App PCRS : पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांनी तुम्हीही कधी त्रस्त झाला आहात का? या खड्ड्यांमध्ये पडून किंवा ते चुकवताना अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. पण असा खड्डा रस्त्यात दिसल्यानंतर नेमकी तक्रार कोणाकडं करायची हे आपल्याला कळत नाही. पण आता या समस्येवर राज्य शासनानं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.
यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं अर्थात पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटनं एक मोबाईल अॅप डेव्हलप केलं आहे. या अॅपवर तुम्ही रस्त्यातील धोकादायक खड्ड्यासंदर्भात माहिती अपलोड करु शकता. विशेष म्हणजे पुढच्या ७२ तासांत अर्थात तीन दिवसांत तो खड्डा प्रशासनाकडं बुजवलेला असेल.