राज्यावर घोंगावतेय वीज संकटाचे सावट; एक दिवस पुरेल येवढाच साठा

राज्यावर घोंगावतेय वीज संकटाचे सावट; एक दिवस पुरेल येवढाच साठा
Updated on

नागपूर : वेकोलिकडून तीन महिन्यांपासून महानिर्मितीच्या वीज प्रकल्पांना अपेक्षित मागणीच्या ५० टक्केच कोळसापुरवठा केला जात आहे. यामुळे वीज प्रकल्पांमध्ये कोळशाची प्रचंड टंचाई जाणवत आहे. महाजेनकोकडे सोमवारी केवळ १ लाख ६३ हजार ८९५ मेट्रिक टन साठा उपलब्ध होता. हा साठा केवळ एकच दिवस पुरू शकतो. पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने राज्यावर वीज संकटाचे सावट घोंगावते आहे.

विजेच्या मागणीत सतत वाढ होत असल्याने व कोळशाअभावी वीज निर्मितीत घट झाली आहे. परिणामी महावितरणला खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करावी लागत असून त्याचा भार वीजग्राहकांवर पडणार आहे. सोमवारच्या (ता. २०) आकडेवारीनुसार महानिर्मितीकडे १ लाख ६३ हजार ५५० मेट्रिक टन कोळसा सध्या उपलब्ध आहे. वीज निर्मितीसाठी रोज किमान १ लाख ४६ हजार ५५० मेट्रिक टन कोळसा लागतो. केंद्र सरकारच्या वेकोलिसह अन्य कंपन्यांकडून ठरल्याप्रमाणे कोळसा पुरवठा होत नसल्याने गंभीर स्थिती ओढवली आहे.

राज्यावर घोंगावतेय वीज संकटाचे सावट; एक दिवस पुरेल येवढाच साठा
माजी आमदाराने वाढविले टेंशन! गणेश मूर्तीचे विसर्जन करायचे कुठे?

ऑगस्ट महिन्याच्या १ तारखेला महाजनकोकडे १४ लाख मेट्रिक टन एवढा साठा उपलब्ध होता. परंतु, कोळसा कंपन्यांकडून दीड महिन्यात कमी पुरवठा झाल्याने जेमतेम एक दिवस पुरेल एवढा म्हणजे १ लाख ६३ हजार ८९५ मेट्रिक टन एवढाच साठाच शिल्लक आहे. जुलै महिन्यात वेकोलिकडून अपेक्षित कोळसा पुरवठ्याच्या केवळ ४७.९५ टक्केच कोळसा प्राप्त झाला. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पुरवठ्याच्या केवळ ५२.६४ टक्के तर सप्टेंबर महिन्यात १९ तारखेपर्यंत ४५.१६ टक्केच कोळसा पुरवठा झाला.

सप्टेंबर महिन्यात वेकोलिकडून २२१६ मेट्रिक टन कोळसा मिळणे अपेक्षित असताना केवळ ८७३ मेट्रिक टन कोळसा म्हणजे केवळ ४५.१६ टक्के कोळसा प्राप्त झाला आहे. वीजनिर्मिती कंपन्यांना नियमित कोळसा मिळावा म्हणून केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आंतर-मंत्रालयीन गटाच्या बैठकीत ऑगस्ट महिन्यापासून महानिर्मितीकडून ऑर्डर बुकिंग प्रोग्रामनुसार कोळसा पुरवठा केला जात नसल्याबद्दल वेळोवेळी तक्रार करण्यात आली. मात्र या गटाच्या बैठकीत कोळसा पुरवठ्याचे आश्वासन देऊनही अपेक्षित कोळसा पुरवला होऊ शकला नाही.

राज्यावर घोंगावतेय वीज संकटाचे सावट; एक दिवस पुरेल येवढाच साठा
वीस वर्षांनंतर पहिल्याच पतीशी पुनर्विवाह; पत्नीने केला होता दुसरा विवाह

डॉ. राऊत यांची कोळसामंत्र्यासोबत चर्चा

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून ठरल्याप्रमाणे कोळसापुरवठा होत नसल्याने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. नियमित व योग्य प्रमाणात कोळसा पुरविण्याची विनंती त्यांनी केली. तसेच वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या राज्यातील खाणीतला कोळसा इतर राज्याच्या तुलनेने महागड्या दराने महाजनकोला विकत असल्याने ते माफक दराने देण्याची विनंतीही त्यांनी केली.

कोळसा टंचाईवर उपाययोजनेचे निर्देश

कोळसा टंचाईच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्वरित योग्य प्रमाणात कोळसा उपलब्ध होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. वेकोलिकडे सतत पाठपुरावा करा. दरवर्षीच ऐन पावसाळ्यात कोळसा टंचाईचा सामना वीजप्रकल्पांना करावा लागतो. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()