प्रभाकर साईलच्या धाडसाचं कौतुक; पिक्चर अभी बाकी है! - संजय राऊत

Sanjay-Raut
Sanjay-RauteSakal
Updated on

मुंबई: कॉर्डिलीया क्रूझ प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवे खुलासे होत असून हे प्रकरण अधिकच गंभीर बनत चालले आहे. आधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या अनेक गौप्यस्फोटांनंतर आता काल रविवारी या प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईलने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण अधिकच महत्त्वाचे बनले आहे. याबाबत आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, मनी लाँड्रींगचे हे प्रकरण आहे. हा खूप मोठा खेळ असून तो आता खेळ सुरु झाला आहे. प्रभाकर साईलचं कौतुक असून त्याच्या सुरक्षेची मागणी मी सरकारकडे केली आहे.

Sanjay-Raut
समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील फोटो आला समोर

संजय राऊत म्हणाले की, प्रभाकर जो साक्षीदार आहे त्याने केलेला खुलासा म्हणजे या देशावरचे मोठे उपकार आहेत. त्याच्या साहसाची मी दाद देतो. हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. देशभक्तीच्या आडून घृणास्पद काम करणाऱ्यांना ही चपराक आहे. हे देशद्रोही लोक आहेत. आता अनेक गोष्टी समोर येतील, असंही त्यांनी म्हटलंय.

पुढे त्यांनी म्हटलंय की, मलिकांनी काही गोष्टी समोर आणल्या आहेत, आता आणखी येतील. त्या व्हिडीओची सीबीआय चौकशी व्हायला हवी. आता तुमच्या काळजाला वार झाल्यावर तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी करताय. ठिकाय, करा जरुर करा, असं त्यांनी म्हटलंय.

Sanjay-Raut
'तुम्हाला तर बुद्धू...' भारत-पाक सामन्यानंतर सुब्रमण्यम स्वामींचं टि्वट चर्चेत

किरण गोसावी कुठाय हे भाजपला माहिती असेल. परमबीर सिंग कुठेय हेही त्यांना माहिती असेल. कारण महाराष्ट्राला बदनाम करण्याची यांनी एकही संधी सोडली नाहीये, असा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, प्रभाकर हा महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याची सुरक्षा व्हायला हवी. हे राज्याला बदनाम करण्याचं षड्यंत्र एका पक्षाने रचलं आहे आणि त्याला काही अधिकाऱ्यांनी साथ दिली आहे. प्रभाकरच्या साहसाचं कौतुक आहे. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी.

किरण गोसावी कुठे गायब आहे, त्यांचा घातपात झालय का? या प्रश्नावर त्यांनी म्हटलं की, किरण गोसावीच्या घातपाताची शक्यता ज्यांनी वर्तवली आहे, त्यांनाच या प्रश्नाबद्दल विचारावं लागेल. इंटरवल पर्यंतची गोष्ट मलिकांनी सांगितलीय. नंतरचा भाग मी सांगेन, असा दावा देखील त्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()