Nawab Malik : ''नवाब मलिक आमच्याबरोबर आहेत, असा आमचा दावा नाही'', प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केली भूमिका

Nawab Malik
Nawab Malikesakal
Updated on

नागपूरः राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवारपासून सुरु झालेलं आहे. शुक्रवारी अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. नवाब मलिक यांच्या सभागृहातील उपस्थितीवरुन पेटलेलं रान शांत व्हायचं नाव घेत नाही. मुख्यमंत्र्यांच्या दालनातील बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत एक बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना तटस्थ भूमिका मांडली.

Nawab Malik
Eknath Shinde: मलिकांच्या पत्रावर शिंदे-फडणवीस एकत्र; प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'जनहिताचा अन् लोकभावनेचा...'

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आम्ही मलिकांशी राजकीय चर्चा केलेली नाही. ते आमच्याबरोबर आहेत का कुणाबरोबर, याबद्दल काहीही बोलणी झालेली नाही. मलिक आमच्याबरोबर आहेत, याचा क्लेम आम्ही यापूर्वी कधीच केलेला नाही. ते वैद्यकीय कारणास्तवर जामिनावर आहेत.

सध्या केवळ त्यांची प्रकृती हाच मुद्दा असून त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करतील. कालच्या त्यांच्या उपस्थितीवरुन गदारोळ झाला, मात्र आसन व्यवस्था अध्यक्षच ठरवत असतात. मलिक हे राष्ट्रवादीचे आमदार असल्याने त्यांची व्यवस्था तशी ठरवलेली असावी.

Nawab Malik
Devendra Fadnavis Letter Bomb : मलिक हे अजित पवार गटात आहेत की नाहीत? प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं भेटीचं कारण

पटेल पुढे म्हणाले, सरकार व्यवस्थित सुरु आहे, तीन राज्यांमध्ये भाजपचं सरकार आलेलं आहे आणि राज्य सरकारने अनेक चांगली पावलं उचललेली आहेत. त्यामुळे विरोधकांना मुद्दा सापडत नाहीये. म्हणूनच मलिकांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार काय म्हणाले?

गुरुवारच्या लेटर बॉम्बनंतर अजित पवार यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मला मिळालं आहे. ते मी वाचलं आहे. नवाब मलिक हे काल पहिल्यांदांच सभागृहात आले होते. आम्ही महायुती सरकारसोबत गेल्यानंतर ते पहिल्यांदाच बाहेर आहेत. अद्याप त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं नाही. त्यांनी मत आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी माझी आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करेन', असं अजित पवार म्हणालेत.

'देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला उत्तर देणार का?' या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, त्या पत्रावर जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय मी घेईन. विधानसभेत कुणी कुठल्या बाकावर बसायचं हा अधिकार फक्त विधानसभा अध्यक्षांनाच आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.