Devendra Fadnavis Letter Bomb : मलिक हे अजित पवार गटात आहेत की नाहीत? प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं भेटीचं कारण

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक यांच्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Devendra Fadnavis Letter Bomb : मलिक हे अजित पवार गटात आहेत की नाहीत? प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं भेटीचं कारण
Updated on

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे विधीमंडळ अधिवेशनाच्या कामाकाजात सहभागी झाले, इतकेच नाही तर सत्ताधारी गटाच्या बाकावर जाऊन बसले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका स्पष्ट करत अजित पवारांना पत्र लिहीलं. या मुद्द्यावर सध्या राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक यांच्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, नवाब मलिक आमचे जुने आणि ज्येष्ठ सहकारी कित्येक वर्षापासून राहिले आहेत. त्यांच्यावर मध्ये काही आरोप झाले, त्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील अंतर्गत घडामोडी झाल्या. त्यावेळी नवाब मलिक कोणाबरोबरही नव्हते. मेडिकल ग्राउंडवर त्यांना जामीन मिळाल्यानंतर आम्ही सगळेच त्यांना भेटायला गेलो. बाकीचे लोकही गेले. सहकाऱ्यांच्या तब्येतीबाबत माहिती घेणं हे आमचं कर्तव्य होतं असेही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

नवाब मलिक हे आमदार आहेत आणि ते विधानसभेत आल्यानंतर जुने सहकारी त्यांना भेटले ते स्वभाविक आहे. आम्ही कुठेही नवाब मलिकांची भुमिका काय? त्यांची उद्याची वाटचाल काय? याबद्दल कुठलीही चर्चा केली नाही. ते मेडिकल बेलवर असल्याने या विषयावर त्यांच्याशी अजिबात चर्चा करायची नाही.

Devendra Fadnavis Letter Bomb : मलिक हे अजित पवार गटात आहेत की नाहीत? प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं भेटीचं कारण
Devendra Fadnavis: "पिते दूध डोळे मिटूनी.. जात मांजराची..."; सिंचन घोटाळा फेम अजित पवार म्हणत राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

ते (नवाब मलिक) विधानभवनात कुठे बसले हे महत्वाचं नाहीये. त्यांच्याकडे अधिकार आहे म्हणून ते आले. आता आल्यावर कोणाला भेटल्यानंतर आम्ही त्यांना पुरस्कृत करतो किंवा दुसरे त्यांना पुरस्कृत करतात म्हणणं ही दिशाभूल करणारी गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहीलं त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. नवाब मलिक आमच्याकडे आहेत की दुसरीकडे आहेत, हा प्रश्नच निर्माण केला नाहीये. हा प्रश्न पुढचा आहे, पुढे काही होईल तेव्हा उत्तर देऊ असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Devendra Fadnavis Letter Bomb : मलिक हे अजित पवार गटात आहेत की नाहीत? प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं भेटीचं कारण
Nawab Malik : मुख्यमंत्री देखील नाराज? फडणवीसांच्या लेटर बॉम्बनंतर महायुतीमध्ये अजित पवार पडले एकटे

मेडिकल बेलवर ते बाहेर आल्याने आम्ही त्यांच्यासोबत राजकीय चर्चाच केलेली नाहीये. फक्त एक सदिच्छा भेट तब्यतीची विचारपूस करण्यासाठी घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाब मलिकांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय असणार आहे यावर मी भाष्य करू इच्छित नाही. त्यांची प्रकृती बरी व्हावी अशी मी प्रार्थना करतो असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.