Praful Patel Cleanchit: CBIकडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचीट; भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल

प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Praful Patel
Praful Patel
Updated on

नवी दिल्ली : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे. त्यामुळं पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात सीबीआयनं याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधातील ही केस बंद झाली आहे. (Praful Patel clean chit by CBI in case of curruption closer report submited at rouse avenue court)

Praful Patel
Govinda Joins ShivSena: अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; उत्तर-पश्चिम मुंबईतून उमेदवारी मिळणार?

सन २०१७ मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितलं आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री असताना प्रफुल्ल पटेल यांनी भ्रष्टाचार करुन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरु होता. (Marathi Tajya Batmya)

या प्रकरणी सीबीआयनं आता आपला क्लोजर रिपोर्ट दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात दाखल केला. टीव्ही ९ नं याबाबत वृत्त दिलं आहे.

Praful Patel
MVA Seats Sharing: मुंबईतल्या 6 जागांवरुन मविआत धुसफूस; काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीनंही केला 'इतक्या' जागांवर दावा

पण जेव्हा प्रफुल पटेल हे शरद पवारांसोबत होते तेव्हा त्यांची याप्रकरणी चौकशी सुरु होती. पण आता ते अजित पवारांसोबत आहेत आणि अजित पवार हे भाजपसोबत आहेत. त्यामुळं त्यांना ही क्लनीचीट मिळाली असल्याची चर्चा रंगू लागली आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.