...म्हणून प्रमोद महाजनांनी 2004 मध्ये NCP-BJP युती होऊ दिली नाही; प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट

कर्जतमध्ये निर्धार सभेमध्ये बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपसोबत युती करणार होतो
...म्हणून प्रमोद महाजनांनी 2004 मध्ये  NCP-BJP युती होऊ दिली नाही; प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट
Updated on

रायगड- कर्जतमध्ये निर्धार सभेमध्ये बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपसोबत युती करणार होतो. पण, भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यामुळे युती होता होता राहिली असा दावा त्यांनी केला आहे. (praful patel in karjat rally with ncp ajit pawar said about alliance with bjp pramod mahajan sharad pawar knp94)

2004 साली राष्ट्रवादी नुकतीच जन्माला आली होती. त्यावेळीं 16-16-16 करत लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला आणि भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या घरी मीटिंग झाली होती. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंग यांच्या सूचनेनुसार हे झालं होतं.

त्यावेळीं प्रमोद महाजन यांना लक्षात आलं की आपलं दिल्लीतील महत्त्व कमी होइल. त्यामुळे त्यांनी बळासाहेब ठाकरे यांना माहिती लीक केली आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी आडवी तिढवी टीका केली आणि होणारी युती होऊ शकली नाही, असं पटेल म्हणाले आहेत.

...म्हणून प्रमोद महाजनांनी 2004 मध्ये  NCP-BJP युती होऊ दिली नाही; प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट
प्रशिक्षण नव्हे, अख्खे केंद्रच बारामतीला! निवडणुकीत अजित पवार गटाला बसू शकतो फटका; आमदार सुभाष देशमुखांनी लिहिले ‘या’ अधिकाऱ्याला पत्र

प्रमोम महाजन यांना मिटिंगच माहिती नव्हतं. त्यांना वाटलं की मी दिल्लीतील महाराष्ट्राचा निर्विवाद नेता आहे.शरद पवार सोबत आले तर आमचे वरिष्ठ नेते शरद पवारांचं ऐकतील माझं ऐकणार नाहीत. त्यामुळे त्यांनी ही गोष्ट बाळासाहेबांना लावून दिली. त्यावेळी बाळासाहेबांनी आडवेतिडवे वक्तव्य केली आणि आमती युती फिस्कटली असे ते म्हणाले.

माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. भविष्यात मी देखील पुस्तक लिहिणार आहे. त्यावेळी मी माझी बाजू मांडेल. इथ दिलीप वळसे पाटील देखील बसले आहेत. त्यांच्या देखील पोटात खुप काही दडलं आहे. अनेक गोष्टी त्यांनी पोटात साठवल्या आहेत. 2 जुलैला आपण सत्तेवर आलो. आपण जे पाऊल टाकलं ते पक्षाचा हितासाठी टाकलं आहे, असं ते म्हणाले.

...म्हणून प्रमोद महाजनांनी 2004 मध्ये  NCP-BJP युती होऊ दिली नाही; प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट
Ajit Pawar: आम्ही काही साधूसंत नाही...; घेतलेल्या वेगळ्या भूमिकेबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

आपल्या पक्षाचा प्रवास केवळ विधानसभा लोकसभेपर्यंत नाही. पुढील 20 ते 25 वर्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे. मी शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे. शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि 1986 मध्ये परत आले. शरद पवार हे कायम प्रवाहासोबत चालले आपण देखील प्रवाहासोबत चाललो आहोत, असं ते म्हणाले.

अजित पवार यांना हे भेकड म्हणतात. त्यांना सांगतो राज्यांत जो कोणी मर्द असेल तर ते एकमेव अजित पवार आहेत. अजित पवार यांचे चांगले आणि गोड संबंध होते. पण, मी शरद पवार यांच्या जवळ होतो.

त्यामुळं अजित पवार यांच्यासोबत मी गेलो त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटलं की, अजित पवार यांच्यासोबत कसं काय गेलो? अनेकांना वाटलं यांचं आतून सख्य आहे. आपण अजित पवार यांच्यासोबत जाताना राजकीय भूमिका घेतली होती.आता आपण भूमीका घेतली आहे दादा एके दादा, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.